७०० सीसीटीव्ही, ४०० गुन्हेगारांची झडती अन् एआयची मदत; पोलिसांना गुंगारा देणारे बोपदेव प्रकरणातील आरोपी अखेर ताब्यात
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ७०० सीसीटीव्ही, ४०० गुन्हेगारांची झडती अन् एआयची मदत; पोलिसांना गुंगारा देणारे बोपदेव प्रकरणातील आरोपी अखेर ताब्यात

७०० सीसीटीव्ही, ४०० गुन्हेगारांची झडती अन् एआयची मदत; पोलिसांना गुंगारा देणारे बोपदेव प्रकरणातील आरोपी अखेर ताब्यात

Updated Oct 12, 2024 12:46 AM IST

Bopdev Ghat rape case : पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणातील आरोपींचा छडा पुणे पोलिसांनी लावला आहे. तब्बल ९ दिवस आरोपींनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी विविध क्लूप्त्या वापरल्याचं तपासात पुढं आलं आहे. मात्र, अखेर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे.

७०० सीसीटीव्ही, ४०० गुन्हेगारांची झडती अन् एआयची मदत; पोलिसांना गुंगारा देणारे बोपदेव प्रकरणातील आरोपी अखेर ताब्यात
७०० सीसीटीव्ही, ४०० गुन्हेगारांची झडती अन् एआयची मदत; पोलिसांना गुंगारा देणारे बोपदेव प्रकरणातील आरोपी अखेर ताब्यात

Bopdev Ghat rape case accaused arrested : पुण्यातील बोपदेव घाट येथे मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर तिघा आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून व जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. गेल्या ९ दिवसांपासून हे आरोपी पुणे पोलिसांना गुंगारा देत होते. आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी जंग जंग पछाडले. तरी सुद्धा आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेर ७०० सीसीटीव्ही, ४०० सराईत गुन्हेगारांची झडती घेऊन एआयच्या माध्यमातून अखेर पुणे पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला.

या आरोपीला पुणे पोलिसांच्या पथकाने गुरुवारी वारजे माळवाडी परिसरातून अटक केली आहे. एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून दोघे फरार आहे. या आरोपीने गुन्हा कबूल केला असून सर्व आरोपी राज्यभाहेरील असून रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

पुण्यात बोपदेव घाटात रात्री आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणीवर आणि तिच्या मित्रावर हल्ला करण्यात आला होता. त्यांना शस्त्राचा आणि लाकडी दांडक्यांचा धाक दाखवत त्यांच्याजवळ असेलल्या वस्तू घेऊन तरूणाला झाडाला बांधून ठेवण्यात आले होते. तर यानंतर तिघांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. यानंतर हे आरोपी फरार झाले होते. ९ दिवसांनपासून पोलिस आरोपींच्या मागावर होते. तब्बल ६० पथक व गुन्हे शाखेचे कर्मचारी या आरोपींचा मग काढत होते. अखेर शुक्रवारी पुणे पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आरोपींनी मुलीवर बलात्कार केल्यावर पोलीसांना सापडू नये यासाठी विविध क्लूप्त्या वापरल्याचं तपासात पुढं आलं आहे.

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी २० किमीच्या प्रवासासाठी वळसा घालून ८० किमीचा प्रवास

बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर चोरीचे गुन्हे याआधी दाखल झालेले आहेत. त्यातील एकावर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल आहे. गेल्या गुरुवारी तरुणीवर बलात्कार केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सीसीटीव्हीत सापडू नये याची काळजी आरोपींनी घेतली. बलात्कार केल्यावर आरोपी बोबदेव घाटाच्या वरच्या भागात गेले, तिथून काही वेळाने त्याच रस्त्याने घाट उतरुन कोंढवा भागात आले. कोंढवा भागात अनेक वेगवेगळ्या रस्त्यांनी त्यांनी ट्रीपल सीट प्रवास केला. जेणेकरुन सीसीटीव्हीची साखळी तुटावी. मात्र पोलीसांना तपास करताना कोंढवा भागातील एका व्यक्तीने या तिघांना ट्रीपल सीट फिरताना पाहिल्याचे सांगितले. पोलीसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. आणि पुण्याजवळील वारजे येथून एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली. दरम्यान, तिघेही आरोपी एका बियर शॉपीतून दारू घेतांना देखील आढळले आहे. दरम्यान, आरोपींच्या दोन साथिदारांचा तपास सुरू आहे.

७०० सीसीटीव्ही, एआयची मदत अन् ४०० गुन्हेगारांची झाडाझडती

पुणे पोलिसांनी या प्रकरणी तब्बल ६० पथकांची स्थापना केली होती. पीडित मुलगी आणि तरुणाने दिलेल्या वर्णनानुसार आरोपीचे रेखाचित्र काढून तपास सुरू करण्यात आला. मात्र, घाटात सीसीटीव्ही आणि मोबाइल रेज नसल्याने आरोपीचा शोध घेण्यास अडचणी येत होत्या. यामुळे पोलिसानी नागपूर येथील एआय सिंबा द्वारे चोरट्यांचा शोध घेतला. सीसीटीव्ही आणि रेखचित्रामुळे गुन्हेगारांची ओळख पटली आणि पोलिसांचा तपास सोपा झाला. या आरोपींवर या पूर्वी देखील गुन्हे असल्याने त्यांचा शोध घेणे सोपे झाले आणि खबऱ्यांमार्फत मिलेलेल्या माहितीनुसार पुण्यातील वारजे भागातून एका आरोपीला अटक करण्यात आली. सध्या फरार आरोपींचा देखील शोध घेतला जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर