मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates : राज्यात पावसामुळं ७ लोकांचा मृत्यू, अतिवृष्टीचं संकट कायम!

Weather Updates : राज्यात पावसामुळं ७ लोकांचा मृत्यू, अतिवृष्टीचं संकट कायम!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jul 14, 2022 09:32 AM IST

Maharashtra Rain Updates : गेल्या आठवड्याभरापासून मुंबई, नाशिक आणि पालघरसह राज्यातील सर्वच भागात पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळं अनेक नद्या-नाल्यांना पूर आला आहे. याशिवाय अतिवृष्टीमुळं राज्यात सात लोकांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Rain Updates
Maharashtra Rain Updates (HT)

Maharashtra Rain News Today In Marathi : गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं महामार्ग बंद पडले आहे. अतिवृष्टीमुळं राज्यातील काही ठिकाणी दरडी कोसळून तर काही ठिकाणी पूरात वाहून गेल्यानं सात लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पालघरमध्ये कोसळलेल्या दरडीमुळं एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याच्याच कुटुंबियातील दोन लोक गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय नाशिमध्येही पूरानं थैमान घातलं आहे. गोदावरी नदीला आलेल्या पूरामुळं गेल्या २४ तासांत सहा लोक पूराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळंच नाशिक आणि पालघर जिल्ह्यांमध्ये हवामान खात्यानं रेल अलर्ट जारी केला आहे.

पालघरमध्ये भूस्सखन झाल्यानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली लोक अडकलेले असण्याची शक्यता असल्यानं प्रशासनात मदत व शोधकार्य सुरू केलं होतं. याशिवाय वसईत कोसळलेल्या दरडीमुळं एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी आणी मुलाला ढिगाऱ्याखालून काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

त्याचबरोबर नाशिक शहरात काल मुसळधार पाऊस झाल्यानंदेखील लोकांना घराबाहेर पडणं कठीण झालं होतं. दिंडोरी तालूक्यात सहा वर्षी मुलगी नातेवाईकांसोबत आळंदी नदी पार करत असताना पाय घसरून नदीत वाहून गेली आहे. याशिवाय पेठ तालुक्यातील पळशी गावातील एक व्यक्ती गोदावरी नदीत तर सुरगाना तालुक्यातील एक व्यक्ती नारा नदीत वाहून गेला आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या