Tree Falls On Akola Temple: अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज मंदिरावर रविवारी (९ एप्रिल २०२३) झाड कोसळल्याने सात जाणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३० हून अधिकजण जखमी झाले आहेत. याशिवाय, अनेकजण ढिगाऱ्याखाली अकडल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांकडून या दुर्घटेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. या घटनेवर राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात असताना अंधश्रद्धेमुळे सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे.
बाबूजी महाराज मंदिरात रविवारी रात्री आरतीचे आयोजन करण्यात आले होते. या आरतीला मोठ्या संख्येत ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली. मात्र, आरती सुरू असताना वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे मंदिराबाहेर आरतीसाठी उभे असलेले भाविक मंदिरात आले. याच दरम्यान, अनेक वर्ष जुने असलेले लिंबाचे झाड मंदिराच्या शेडवर कोसळले आणि मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास ३० जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या मंदिरात अधोरी उपचार सुरू होते. अंधश्रद्धेला बळी पडलेले नागरिक या मंदिरात येत होते. अंधश्रद्धेमुळेच सात जणांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आला आहे.
मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर
अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच शासकीय खर्चाने सर्व जखमींवर व्यवस्थित उपचार करण्यात यावेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.
संबंधित बातम्या