इस्रायली पुरुषांवर बलात्कार केल्याप्रकरणी भडकला हमास! आपल्याच 'गे' साथीदाराला दिली भयानक मृत्युदंडाची शिक्षा
https://marathi.hindustantimes.com/nation-and-world/hamas-got-angry-over-the-rape-of-israeli-men-tortured-and-killed-its-own-gay-member-141738830418448.html
पुण्यासह राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येत पुण्यात आणखी एका जीबीएस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कर्वेनगरमधील वादरवस्तीत राहणाऱ्या ६३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. काशीबाई नवले रुग्णालयात या रुग्णाचा मृत्यू झाला. हा पुण्यातला सहावा मृत्यू असून राज्यातला सातवा मृत्यू आहे. या रुग्णाला ताप, जुलाब, चालण्याचा त्रास आणि अशक्तपणा जाणवत होता. आता पर्यंत पुण्यातील चार, पिंपरी चिंचवड मधील एक तर सोलापुरातील एक अशा एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने गुरुवारी जिल्ह्यातील संशयित गिलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) रुग्णांमध्ये सहावा मृत्यू नोंदविला. कर्वे नगरयेथे राहणाऱ्या ६३ वर्षीय व्यक्तीचा काशीबाई नवले रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर म्हणाल्या, 'राज्यात आतापर्यंत सहा संशयित जीबीएस मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी केवळ एका नागरिकाचा मृत्यू हा जीबीएसमुळे झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर पाच रुग्णांचा मृत्यू हा जीबीएस संशयित आहेत.
मृत्यू झालेल्या या व्यक्तीला जुलाब,अशक्तपणा आणि चालता येत नव्हते. त्यांना २८ जानेवारी २०२५ रोजी काशीबाई नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आयव्हीआयजी देण्यात आले, मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी, ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी मृत्यूची नोंद करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृत्यूचे तात्कालिक कारण तीव्र इस्केमिक स्ट्रोक, मधुमेह मेलिटस आणि जीबीएस असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र, मृत्यूचे मूळ कारण समजण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.
सार्वजनिक आरोग्य विभागाने गुरुवारी तीन संशयित जीबीएस रुग्णांची नोंद केली. जानेवारी २०२५ पासून जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १७३ वर पोहोचली आहे. यापैकी १४० रुग्ण हे जीबीएसचे रुग्ण असल्याची माहिती डॉ. कमलापूरकर यांनी दिली. १४० रुग्णांमध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रात ३४, मनपा क्षेत्रातील नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील ८७, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेत २२, पुणे ग्रामीण भागात २२ आणि इतर जिल्ह्यातील ८ असे एकूण १७३ जीबीएस बाधित रुग्ण आहेत.
कमलापूरकर यांनी सांगितलं की, शहराच्या विविध भागांतील ३ हजार ८६८ पाण्याचे नमुने रासायनिक व जैविक तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ३७ जलस्त्रोतांचे नमुने दूषित आढळले आहेत. आम्ही ८० सीरम नमुने अँटीगॅन्ग्लिओसाइड अँटीबॉडीज चाचणीसाठी निमहान्स बेंगळुरूला पाठवले आहेत.
महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले की, बाधित भागाजवळ असलेल्या लायगुडे रुग्णालयात जीबीएसमधून बरे झालेल्या रुग्णांसाठी महापालिकेने फिजिओथेरपी सुविधा सुरू केली आहे. गुरुवारपासून आम्ही जीबीएसमधून बरे झालेल्या सर्व रुग्णांना फोन करून फिजिओथेरपी सुविधेचा मोफत लाभ घेण्याची विनंती करण्यास सुरुवात केली आहे. तसेच घरोघरी आयईसी उपक्रम, देखरेख आणि मेडिक्लोरचे वितरण सुरू झाले आहे.
शहरात जीबीएसचा उद्रेक झाल्यापासून जिल्ह्यात महापालिकेतील ४५ हजार ५७४, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील २३ हजार १७९ आणि पुणे ग्रामीणमधील १३ हजार १९१ घरांची (एकूण ८१ हजार ९४४) घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या