मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  buldhana food poisoning : बुलढाण्यात उपवासाची भगर आणि आमटी खाल्याने ६०० जणांना विषबाधा

buldhana food poisoning : बुलढाण्यात उपवासाची भगर आणि आमटी खाल्याने ६०० जणांना विषबाधा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 21, 2024 09:20 AM IST

buldhana food poisoning news : बुलढण्यात लोणार तालुक्यातील सोमठाना खापरखेड येथे एका धार्मिक कार्यक्रमात उपवासाची भगर आणि आमटी खालल्यामुळे ६०० जणांना विषबाधा झाली.

buldhana food poisoning news
buldhana food poisoning news

buldhana food poisoning news : नांदेड जिल्ह्यात  तब्बल २ हजार नागरिकांना भगर आणि आमटीतून विषबाधा झाल्याचा प्रकार ताजा असतांना आता बुलढाणा जिल्ह्यात देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. लोणार तालुक्यातील सोमठाना खापरखेड येथे एका धार्मिक कार्यक्रमात उपवासाची भगर आणि आमटी खालल्यामुळे ६०० ग्रामस्थांना विषबाधा झाली. नागरिकांना अचानक उलट्या, चक्कर, जुलाब सुरू झाल्याने धावपळ उडाली. नागरिकांना तातडीने दवाखान्यात हलवण्यात येऊन उपचार सुरू करण्यात आले. 

Maharashtra weather update : राज्यावर अवकाळी पावसाचे संकट; 'या' जिल्ह्यात बरसणार, असे असेल हवामान

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाना खापरखेड येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसाद देखील ठेवण्यात आला होता. दरम्यान, काही नागरिकांना उपवास असल्याने त्यांच्यासाठी भगर आणि आमटी तयार करण्यात आली होती. आरती झाल्यावर पंगत बसवून त्यांना भगर आणि आमटी वाढण्यात आली. भाविकांनी ही भगर आणि आमटी खाल्यावर त्यांना अचानक अवस्थ वाटू लागले.

समलैंगिग पार्टनरसोबत आईला ८ वर्षाच्या मुलाने नको त्या अवस्थेत पाहिलं, बिंग फुटल्याच्या भीतीने आईंनं केलं भयानक कृत्य

काही नागरिकांना उलट्या, चक्कर आणि जुलाब सुरू झाले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गोंधळ उडाला. दरम्यान, काही ग्रामस्थांनी तातडीने आजारी भाविकांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय भरती केले तर काही नागरिकांना लोणार सुल्तानपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. यातील काही ग्रामस्थांची प्रकृती ही गंभीर असल्याचे समजते. जवळपास ५०० ते ६०० जणांना विषबाधा भगर आणि आमटी खाऊन विषबाधा झाली आहे.

माघ एकादशीच्या निमित्ताने एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विषबाधा झालेल्या अनेकांना ज्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते, त्या ठिकाणी अपूरी जागा असल्याने खाली झोपवावे लागले. तर डॉक्टरांची संख्या कमी असल्याने काहींना तातडीने उपचार मिळू न शकल्याने त्यांना दुसऱ्या दवाखान्यात भरती करण्यात आले. दरम्यान, काही केंद्रांमध्ये डॉक्टरच गैरहजर असल्यानं रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाही. यामुळे रुग्णांची प्रकृती खालावली.

IPL_Entry_Point

विभाग