मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Hoardings : मुंबईतील म्हाडाच्या जमिनीवरील ६२ पैकी ६० होर्डिंग्ज बेकायदा, सोमय्या यांच्याकडून पोलिसांत तक्रार

Mumbai Hoardings : मुंबईतील म्हाडाच्या जमिनीवरील ६२ पैकी ६० होर्डिंग्ज बेकायदा, सोमय्या यांच्याकडून पोलिसांत तक्रार

Jun 03, 2024 11:46 PM IST

Mumbai illegal hoardings : मुंबईतील म्हाडाच्या जमिनीवरील ६२ पैकी ६० होर्डिंग्ज बेकायदा असल्याची तक्रार भाजप नेते सोमय्या यांनी पोलिसांत दाखल केली आहे.

मुंबईतील बेकायदा होर्डिग्ज (संग्रहित छायाचित्र)
मुंबईतील बेकायदा होर्डिग्ज (संग्रहित छायाचित्र)

Mumbai illegal hoardings : मुंबईतील म्हाडाच्या मालकीच्या (MHADA land in Mumbai) जागेवर लावलेले ६२ पैकी ६० होर्डिंग बेकायदा असल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी आणि जाहिरात कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. घाटकोपरच्या छेडा नगर भागात १३ मे रोजी वादळी वारे आणि अवकाळी पावसात पेट्रोल पंपावर १२० फुटांचे महाकाय होर्डिंग कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईतील अवैध होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला होता. 

ट्रेंडिंग न्यूज

घाटकोपर दुर्घटनेची तक्रार खेरवाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. वांद्रे येथील खेरवाडी पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मालकीच्या जागेवर अनधिकृत होर्डिंग्जबाबत किरीट सोमय्या यांच्याकडून लेखी तक्रार मिळाल्याची पुष्टी केली. तसेच याबाबच चौकशी सुरू असल्याचे म्हटले. 

हे होर्डिंग्ज लावणाऱ्या म्हाडा, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि १७ जाहिरात कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. म्हाडाच्या जागेवर हे बेकायदा होर्डिंग्ज लावण्याची परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल भाजप नेत्याने तक्रारीत केला आहे. 

मुंबईतील म्हाडाच्या जागेवर उभारण्यात आलेल्या ६२ होर्डिंग्जपैकी केवळ दोन होर्डिंग्जवर अधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र आहे. या बेकायदा होर्डिंग्जची परवाना फी कोण वसूल करत आहे? सोमय्या यांनी विचारले. असे होर्डिंग्ज लावणाऱ्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. संबंधित बीएमसी, म्हाडाचे अधिकारी आणि होर्डिंग कंपन्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा, असे तक्रारीत म्हटले आहे. आर्थिक राजधानीत जाहिरात होर्डिंग्ज लावण्यासाठी मुंबई महापालिका परवाना शुल्क आकारते. म्हाडाच्या जागेवर अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्या जाहिरात कंपन्यांना महापालिकेच्या परवाना विभागाने काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी भाजप नेत्याने केली आहे. महापालिकेच्या परवाना विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, म्हाडाकडून आम्हाला पत्र मिळाले आहे. आम्ही म्हाडाला पत्र पाठवून असे होर्डिंग्ज हटविण्यास सांगणार आहोत.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग