मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : अक्षर चांगले नाही म्हणून विद्यार्थ्याला मारहाण करणे शिक्षिकेच्या अंगलट; गुन्हा दाखल

Pune Crime : अक्षर चांगले नाही म्हणून विद्यार्थ्याला मारहाण करणे शिक्षिकेच्या अंगलट; गुन्हा दाखल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 06, 2022 02:56 PM IST

Pune Crime : पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अक्षर चांगले नाही म्हणून या विद्यार्थ्याला मारहाण करणे शिक्षिकेच्या अंगलट आले असून या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune crime
Pune crime (HT_PRINT)

पुणे : मुलांना लागावी आणि नी अभ्यासात प्रगती करावी याकरिता शाळेतील शिक्षक सातत्याने प्रयत्न करत असतात. परंतु काहीवेळा मुलांचा अभ्यास पूर्ण करुन घेण्यासाठी शिक्षक अतिताण विद्यार्थ्यांना देत असल्याचे प्रकारही घडतातत. असाच प्रकार पुण्यातील वानवडी परिसरातील एका शाळेत घडला आहे. पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अक्षर चांगले नाही म्हणून या विद्यार्थ्याला मारहाण करणे शिक्षिकेच्या अंगलट आले असून या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मुलाच्या वडिलांनी वानवडी पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षिके विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ३५ वर्षीय शिक्षके विरोधात पोसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार यांचा सहा वर्षाचा मुलगा वानवडी परिसरातील लुल्लानगर येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेत आहे. मात्र, मुलाचे अक्षर चांगले नसल्याने संबंधित शिक्षिका वारंवार त्यास वर्गात ओरडत होती. दरम्यान, शिक्षिकेने राग अनावर झाल्यानंतर मुलास हाताने बेदम मारहाण केली. तसेच जर मारहाण झाल्याचे घरी सांगितले तर तुला पुन्हा वर्गात आल्यावर आणखी मारण्याची धमकी शिक्षिकेने दिली. मात्र, मुलाने संबंधित घडलेला प्रकार घरी जाऊन पालकांना सांगितला. त्यानंतर मुलाच्या पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठत आरोपी शिक्षिके विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करत आहे.

तरुणीला बळजबरीने घेऊन जात लग्नाचा हट्ट करणारा तरुण जेरबंद

पुण्यातील २२ वर्षीय तरुणीला एका तरुणाने दुचाकीवरुन ऑफीसला जात असताना, तिची दुचाकी रस्त्यात अडवून तिच्या गाडीला स्वत:ची गाडी आडवी लावून तिचा रस्ता अडवला. त्यानंतर तिला पाठलाग करुन तिचे ऑफीस जवळून जबरदस्तीने स्वत:चे गाडीवर बसवुन बोपदेवघाट येथे तिची इच्छा नसताना घेऊन जात तिच्याशी लग्न करण्याचा आग्रह धरला. परंतु त्यास तरुणीने नकार दिला असता तिला स्वत:चे जीवाचे बरेवाईट करुन घेईन अशी धमकी दिली. याप्रकरणी तरुणिने फराखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपी दिक्षांत प्रशांत वाघमारे (वय २२, रा.पुणे) यास अटक केली करण्यात आली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग