Dombivli Suicide: पत्नीच्या मृत्यूचं दुःख सहन झालं नाही, पतीची दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dombivli Suicide: पत्नीच्या मृत्यूचं दुःख सहन झालं नाही, पतीची दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Dombivli Suicide: पत्नीच्या मृत्यूचं दुःख सहन झालं नाही, पतीची दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Jun 20, 2024 08:58 AM IST

Dombivli Man Dies By Suicide: डोंबिवलीतील एका ५७ वर्षीय सरकारी अधिकाऱ्याने दहाव्या मजल्यावरील उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

डोंबिवलीत पत्नीच्या मृत्युनंतर पतीनेही आत्महत्या केली.
डोंबिवलीत पत्नीच्या मृत्युनंतर पतीनेही आत्महत्या केली.

Dombivli Suicide News: डोंबिवलीतील एका उच्चभ्रू गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या ५७ वर्षीय व्यक्तीने मंगळवारी रात्री दहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वीच मृत व्यक्तीच्या पत्नीचे अपघाती निधन झाले. पत्नीच्या मृत्युचे दु:ख सहन न झाल्यामुळे संबंधित व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती पलवा सिटीतील कासार इस्टेट मध्ये राहत होती. घटनेच्या वेळी त्यांचा २९ वर्षीय मुलगा आणि कुटुंबातील इतर दोन सदस्य घरी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीच्या पत्नीचे नुकतेच एका अपघातात निधन झाल्याने ते नैराशात होते. पत्नीच्या मृत्युला तीन महिने झाल्यानंतरही ते स्वत:ला दु:खातून सावरु शकले नाही. पत्नीशिवाय जगणे सहन होत नसल्याने तो वारंवार मरणाची इच्छा व्यक्त करत असे.

दरम्यान, मंगळवारी रात्रीच्या सुमारास कुटुंबीय झोपलेले असताना दहाव्या मजल्यावरून उडी मारली. मोठा आवाज आल्याने सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी संबंधित व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसला. यानंतर सुरक्षा रक्षकाने तात्काळ कुटुंबीयांना व पोलिसांना माहिती दिली. या व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

मुंबई कौटुंबिक वादाला कंटाळून पोलीस हवालदाराची आत्महत्या

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदारने शुक्रवारी (१४ जून २०२४) रात्री सायन येथील त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. पत्नीशी दररोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून आत्महत्या करतोय, अशी सुसाईट नोट पोलिसांना सापडली.विजय साळुंखे (वय, ३८), असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदारचे नाव आहे. साळुंखे हे शाहूनगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असून सायनच्या प्रतिक्षानगर येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. दरम्यान, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास साळुंखे हे घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पत्नीसोबतच्या सततच्या भांडणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे साळुंखे यांनी सुसाईट नोटमध्ये लिहिले. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर