मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Hingoli Accident: हिंगोलीतील माळेगाव फाट्यावर भीषण अपघात, १५० मेंढ्यांसह पाच जण जागीच ठार

Hingoli Accident: हिंगोलीतील माळेगाव फाट्यावर भीषण अपघात, १५० मेंढ्यांसह पाच जण जागीच ठार

May 25, 2023 06:15 PM IST

Hingoli Road Accident: हिंगोलीतील माळेगाव फाट्यावर गुरुवारी पहाटे भीषण अपघात घडला.

Hingoli Road Accident
Hingoli Road Accident (HT)

Accident: हिंगोलीतील कळमनुरीजवळ असलेल्या माळेगाव फाट्यावर गुरुवारी (२५ मे २०२३) पहाटे मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला. या अपघातात १९० मेढ्यांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. चालकाला झोप लागल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान येथील एक ट्रक २०० हून अधिक मेंढ्या घेऊन हैदराबादच्या दिशने निघाला होता. या ट्रकमध्ये पाच जण होते. यातील चौघेजण ट्रकच्या केबिनमध्ये बसले होते. तर, एक जण मेंढ्यांसोबत पाठीमागे बसला होता. दरम्यान, गुरुवारी पहाटे ट्रक तीन वाजताच्या सुमारास माळेगाव फाट्याजवळ पोहचला असताना ट्रकचालकाला डुलकी लागली. यामुळे त्याचा वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक समोर उभा असलेल्या वाहनाला जोरात धडकला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी पाच जणांना मृत्यू घोषित केले. या अपघातात जवळपास १९० मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर, इतर जखमी मेंढ्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयामार्फत उपचार करण्यात येत आहेत.

सलमान अली मौला अली, सत्यनारायण बळाई, लालू मीना, कदीर मेवाती, आलम आली अशी या अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत. यामधील एकजण राजस्थानमधील, तर इतर चौघे मध्य प्रदेशातील असल्याचे समजत आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग