Government Hospitals : राज्यातील जिल्हा रुग्णालयांचा होणार कायापालट, धाराशिवमध्ये उभारणार ५०० खाटांचे रुग्णालय
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Government Hospitals : राज्यातील जिल्हा रुग्णालयांचा होणार कायापालट, धाराशिवमध्ये उभारणार ५०० खाटांचे रुग्णालय

Government Hospitals : राज्यातील जिल्हा रुग्णालयांचा होणार कायापालट, धाराशिवमध्ये उभारणार ५०० खाटांचे रुग्णालय

Updated Feb 12, 2024 07:07 PM IST

Dharashiv Hospital News : धाराशिव जिल्ह्यात५००बेडसचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारले जाणार आहे. तसेच राज्यातील जिल्हा रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट केला जाणार आहे.

File Pic
File Pic

राज्यातील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट करण्यासाठी आशियाई विकास बँकेने ४ हजार कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. पहिल्या टप्प्यात १२०० कोटी रुपये दिले जाणार असून त्यातून जिल्ह्यांमध्ये अद्ययावत आणि दर्जेदार जिल्हा रुग्णालये उभारली जाणार आहेत. सुरुवातीला धाराशिव जिल्ह्यात ५०० बेडसचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारले जाणार आहे, याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत दिले. 

आशियाई विकास बँकेने इतके मोठे कर्ज मंजूर करण्यापूर्वी सात प्रशासकीय व शैक्षणिक सुधारणा सुचवल्या होत्या. यासंदर्भात सध्याच्या राज्य शासनाने वेगाने पाऊले उचलल्यामुळे कर्ज मंजुरी शक्य झाली असे बँकेचे टीम लीडर डॉ निशांत जैन यांनी सांगितले. यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स,  डिजिटल मेडिकल एज्युकेशन आणि हेल्थ पॉलिसी तसेच ई हॉस्पिटल, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन, मालमत्ता नियोजन , व्यवस्थापन आणि शाश्वतता धोरण, उमेदवार भरती कक्ष, औषध खरेदी अधिकाराचे विकेंद्रीकरण अशा सुधारणा शासनाने केल्या.

१२०० कोटी रुपये प्रकल्पाशी संबंधित बांधकामे, धोरणात्मक बाबींसाठी बँकेकडून देण्यात येणार असून ३५० डॉलर्स म्हणजेच २८०० कोटी रुपये बांधकाम आणि यंत्रसामुग्रीसाठी दिले जातील. सध्या अलिबाग येथे बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे.

आज आशियाई विकास बँकेने १२०० कोटींची तत्वत: मान्यता दिली. धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असल्याने याठिकाणी ५०० बेड्सचे सुसज्ज जिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबवावी व कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीदरम्यान दिले. परभणी येथे देखील जिल्हा रुग्णालय उभारण्याचे विचाराधीन आहे.

धाराशिव येथे जिल्हा रुग्णालय उभारण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी लगेचच जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर