Ahmednagar accident : नगरच्या इमामपूर घाटात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ahmednagar accident : नगरच्या इमामपूर घाटात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Ahmednagar accident : नगरच्या इमामपूर घाटात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Jan 29, 2024 10:51 AM IST

Ahmednagar imampur Ghat accident News : पारनेर तालुक्यात अहमदनगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे:

Accident
Accident

Ahmednagar Imampur Ghat accident News : अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल इथं रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण जखमी झाला आहे. या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

कंटेनरनं दुचाकीला धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला. कंटेनर (HR 38A C5848) छत्रपती संभाजी नगरच्या दिशेनं जात होता. इमामपूर घाटाच्या तीव्र उतारावर पुढं चाललेल्या दोन दुचाकींना (क्रमांक MH 16 CB 5203, क्रमांक MH 16, AV 1931) कंटेनरनं जोराची धडक दिली. त्यात दुचाकीवरील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील भगवान आव्हाड (रा. पांगरमल, ता. नगर) हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला. 

Hinjewadi murder : इंजिनीअर प्रेयसीची प्रियकराकडून गोळ्या घालून हत्या, पुण्यातील हिंजवडीत खळबळ

अनिल बाळासाहेब पवार (वय २०), सोनाली अनिल पवार (वय २२), माउली अनिल पवार आणि एक सहा महिन्यांची मुलगी अशी मृतांची नावं आहेत. हे सर्व जण पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर भागातील वडगाव सावताळ इथं राहणारे होते. 

अपघातग्रस्त कुटुंब शेतकऱ्याचे

अपघातात दुर्दैवी मृत्यू आलेले पवार कुटुंबीय शेतमजूर होते. कांदा काढणीसाठी ते नगर तालुक्यातील सुमारे दीड महिने कापूरवाडीला वास्तव्य होते. अनिल पवार यांच्या मागे आजोबा, आजी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळं वडगाव सावताळ गावावर शोककळा पसरली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर