Thane News: ठाणे शहरात पाण्याच्या टाकीत बुडून ३ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका निवासी सोसायटीत मंगळवारी दुपारी ही घटना घडली. आवारात खेळायला मुलगा कुठेही दिसत नसल्याने कुटुंबाने त्याचा शोध घेतला असता तो पाण्याच्या टाकीत पडल्याचे दिसला. त्याला ताडबतोड रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
ठाणे येथील घोडबंदर रोडवरील एका सोसायटीतील पाण्याच्या टाकीत पडून तीन वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलगा आवारात खेळत असताना ही घटना घडली, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला.
कासारवडवली पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा मुलगा आपल्या आईसोबत ठाण्यातील नातेवाईकाच्या घरी गेला होता. घराबाहेर खेळायला गेलेला मुलगा अचानक गायब झाल्याने कुटुंबाने त्याचा शोध घेतला. त्यावेळी मुलगा इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण सोसायटीत शोककळा पसरली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
संबंधित बातम्या