मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Land Dispute Murder: जमिनीच्या वादातून गेल्या ५ वर्षात ३ हजार २४७ जणांची हत्या

Land Dispute Murder: जमिनीच्या वादातून गेल्या ५ वर्षात ३ हजार २४७ जणांची हत्या

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 02, 2024 11:35 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या पाच वर्षात जमीनीच्या वादातून तीन हजरांहून अधिक लोकांची हत्या झाली आहे.

Murder
Murder

Land Dispute Murder In UP: लखनौच्या मलिहाबाद भागात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याने जमिनीचे वाद सोडविण्यात महसूल अधिकारी अपयशी ठरल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, २०१७ ते २०२२ या कालावधीत उत्तर प्रदेशात किमान ३ हजार २४७ हत्या जमीन आणि मालमत्तेच्या वादातून झाल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

२ ऑक्टोबर २०२३ रोजी देवरिया जिल्ह्यातील फतेहपूर गावात एका ब्राह्मण कुटुंबातील पाच सदस्यांसह सहा जणांची हत्या झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महसूल अधिकाऱ्यांना जमीन आणि मालमत्तेचे वाद प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश दिले. मलिहाबादमध्ये शुक्रवारी घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांच्या ग्रामीण भागात खुनाच्या घटनांमध्ये जमिनीचे वाद हे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एनसीआरबीची आकडेवारी स्कॅन करताना एचटीला असे आढळले आहे की, २०२२ मध्ये जमीन आणि मालमत्तेच्या वादातून २२६, २०२१ मध्ये २२७, २०२० मध्ये ६४२, २०१९ मध्ये ५१६, २०१८ मध्ये १ हजार ३२३ आणि २०१७ मध्ये ३१३ लोकांचा मृत्यू झाला.

गिरी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीजचे सहाय्यक प्राध्यापक प्रशांत त्रिवेदी म्हणाले की, "जमिनीचा वाद हे केवळ आर्थिक कारण न राहता कुटुंबांची प्रतिष्ठा आणि वर्चस्व आहे, त्यानंतर अशा वादांमुळे विशेषत: उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात हत्या होतात.

माजी आयपीएस अधिकारी उमेश कुमार सिंह म्हणाले की, मलिहाबाद ची घटना मुळात दोन कुटुंबांमधील प्रलंबित वाद सोडविण्यात स्थानिक प्रशासनाचे अपयश आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग