Viral News: आजकाल लग्नासाठी ऑनलाइन डेटिंग अॅप्स आणि सोशल मीडियावर जाहिरातींचा ट्रेंड आहे. दरम्यान, सोशल मीडियावर लग्नाची जाहिरात व्हायरल होत आहे, ज्यात ३० वर्षीय महिला वराच्या शोधात आहे. संबंधित महिलेला मुलगा एकुलता एक हवा आहे. तसेच त्याच्या ८ एकरांचे फार्महाऊस असावे, अशा अनेक मागण्या महिलेने केल्या आहेत. या जाहिरातीवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या जाहीरातीमध्ये असे दिसत आहे की, संबंधित महिला अशा वराच्या शोधात आहे, ज्याचे वय २५ ते २८ असावे. तो त्यांच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असावा. त्याचा व्यवसाय चांगला आणि भक्कम असावा. त्याच्याकडे किमान २८ एकरांचा बंगला किंवा फार्महाऊस असावे. तसेच त्याला स्वयंपाक करता यायला पाहिजे. या पोस्टला तीन हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर, ८०० हून अधिक वेळा ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.