मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur News : धुणं धुण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला! हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

Kolhapur News : धुणं धुण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला! हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 07, 2024 04:07 PM IST

Kolhapur News : कोल्हापूर येथील आजरा तालुक्यात मन सुन्न करणारी एक घटना घडली आहे. येथील हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे.

धुणं धुण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला! हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना
धुणं धुण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला! हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुकीची धामधूम सुरू असतांना एक वाईट घटना पुढे आली आहे. येथील आजरा तालुक्यात ही घटना घडली आहे. हिरण्यकेशी नदीत (Hiranyakeshi River) धुणे धुण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे. मृत तिघेही एकाच कुटुंबातील होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Dattatray Bharne:'लाज कशी वाटत नाही....' आमदार दत्ता भरणेंनी कार्यकर्त्याला दिल्या शिव्या! रोहित पवारांची आयोगाला तक्रार

उदय बचाराम कटाळे, अरुण बचाराम कटाळे, प्रकाश अरुण कटाळे अशी पाझर तलावात बुडून मृत्यू झालेल्या मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीत बुडून मृत्यू झालेल्या कटाळे बंधु यांची नावे आहेत. हे तिघेही जण नदीत धुणं धुण्यासाठी आले होते. यावेळी धुणे धूत असतांना अचानक एकाचा पाय घसरून तो नदीत पडला.

Govt Savings schemes : दररोज फक्त २५० रुपये गुंतवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

त्याला वाचवण्याच्या नादात दोघे देखील नदीत उतरल्याने त्यांचा देखील बुडून मृत्यू झाला. या घटनेची महिती मिळताच बचाव कार्य राबवण्यासाठी स्थानिकांनी घटनास्थळी धाव ठेतली. काहींनी गजरगाव नजीकच्या बंधाऱ्यात तिघांना शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याची माहिती मिळाल्यावर पोलिस देखील घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

World Asthma Day 2024: दम्याच्या रुग्णांनी या गोष्टींपासून राहावे दूर, जाणून घ्या कोणते पदार्थ वाढवणार नाही समस्यापाझर तलावात बुडून तिघांचा मृत्यू

करेकुंडी येथील पाझर तलावात पोहायला गेलेल्या शाळकरी मुलींना वाचवायला गेलेल्या सेवानिवृत्त जवानासह दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतांना आज घडलेल्या घटनेने हलहळ व्यक्त केली जात आहे. करेकुंडी येथील पाझर तलावात शाळकरी मुली पोहायला गेल्या होत्या. यानंतर पोहतांना दम लागल्याने दोघींचा बुडून मृत्यू झाला. यावेळी सेवानिवृत्त विजय विठोबा शिनोळकर हे त्यांना वाचवायला गेले. मात्र, त्यातत चैतन्या नागोजी गावडे, आणि समृद्धी अजय शिनोळकर या दोन्ही मुलींसह तिघेही तलावात बुडाले. सायंकाळी तलावाच्या काठावर तिघांचे कपडे गावातील एकाला दिसले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

IPL_Entry_Point

विभाग