मुंबईत खळबळ! सीएसएमटी स्थानकाजवळ २९ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईत खळबळ! सीएसएमटी स्थानकाजवळ २९ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

मुंबईत खळबळ! सीएसएमटी स्थानकाजवळ २९ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

Oct 04, 2024 04:53 PM IST

Mumbai CSMT Gangrape Case : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

मुंबईत खळबळ! सीएसएमटी स्थानकाजवळ २९ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार
मुंबईत खळबळ! सीएसएमटी स्थानकाजवळ २९ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (REUTERS)

CSMT Gangrape Case : पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना आता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळं खळबळ उडाली आहे.

ही घटना २२ सप्टेंबरच्या रात्री घडली. पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार, दोन अज्ञात व्यक्तींनी तिला धमकावलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सीएसएमटी स्थानकाजवळ पी डिमेलो रोडवरील टॅक्सी स्टँडच्या मागे महिला एकटी असताना हा प्रकार घडला. आरोपींपैकी एकानं तिचं तोंड दाबलं आणि दुसऱ्यानं तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्यानं तोंड दाबलं आणि पहिल्यानं अत्याचार केला.  

या प्रकरणी आधी सीएसएमटी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र त्यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलं आहे. पोलिसांनी संशयितांची ओळख पटवून त्यांना पकडण्यासाठी तपास सुरू केला आहे. सर्व बाजूंनी सखोल चौकशी सुरू आहे.

आरोपींना ओळखू शकते, पण…

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडित महिला त्या आरोपींना चेहऱ्यानं ओळखू शकते. मात्र, त्यांची नावं तिला माहीत नाहीत. या घटनेनंतर पीडितेला दादर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिची प्रकृती आता स्थिर असल्याचं समजतं. 

महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मागील काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारी विशेषत: महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. बदलापूरच्या शाळेतील चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचारानं काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र ढवळून निघाला होता. त्यानंतर आज पहाटे बोपदेव घाट परिसरात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यावरून चिंता व्यक्त होत असतानाच मुंबईतील घटना उघडकीस आली आहे. तुलनेनं सुरक्षित समजल्या जाणाऱ्या व कधी न झोपणारे शहर अशी ओळख असलेल्या मुंबईत हा प्रकार घडल्यानं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर