Ulhasnagar Murder: जुन्या वैमनस्यातून बदला घेण्यासाठी उल्हासनगरमध्ये गुरुवारी पहाटे पाच जणांनी एका २८ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक तीनमधील इमली पाडा येथे ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल जयस्वाल असे मृताचे नाव आहे. गुरुवारी सकाळी मुख्य आरोपी बाबू ऊर्फ पंजाबी मनोहर धनकीने करण ढाकणी टोळीतील इतर सदस्यांसह जयस्वाल यांच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर राहुल आणि त्याची आई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी जात होते. राहुल आणि त्याची आई फरव्हर लाईनच्या चौकात पोहोचताच बाबू ढाकणी याने आपल्या टोळीतील सदस्यांसह त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली.
राहुल जमीनीवर कोसळल्यानंतर आरोपीने दगडाने ठेचून त्याची हत्या केली. डोळ्यात मिरचीपूड डोळ्यात गेल्याने काय चालले आहे, हे राहुलच्या आईला समजत नव्हते. राहुलची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे यांनी सांगितले की, फरार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच कलम ३०२ अन्वये त्यांना अटक करण्यात येईल. २०२२ मध्ये बाबू आणि त्याच्या दोन साथीदारांनी राहुलच्या दुचाकीला आग लावली होती. त्यावेळी राहुलने बाबूविरोधात मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. नुकतीच बाबूची जामिनावर सुटका झाली होती.
संबंधित बातम्या