मरिन ड्राइव्ह येथील समुद्रात २३ वर्षीय तरुणीची आत्महत्या, लॅपटॉप बॅग अन् व्हॉट्सॲप चॅटवरून पटली ओळख
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मरिन ड्राइव्ह येथील समुद्रात २३ वर्षीय तरुणीची आत्महत्या, लॅपटॉप बॅग अन् व्हॉट्सॲप चॅटवरून पटली ओळख

मरिन ड्राइव्ह येथील समुद्रात २३ वर्षीय तरुणीची आत्महत्या, लॅपटॉप बॅग अन् व्हॉट्सॲप चॅटवरून पटली ओळख

Updated Jul 15, 2024 05:51 PM IST

Marine Drive : मुंबईच्या मरिन ड्राइव्ह येथील समुद्रात एका २३ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मरिन ड्राइव्ह पोलीस आणि अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तरुणीला समुद्रातून बाहेर काढले.

मरिन ड्राइव्ह येथील समुद्रात २३ वर्षीय तरुणीची आत्महत्या
मरिन ड्राइव्ह येथील समुद्रात २३ वर्षीय तरुणीची आत्महत्या

marine drive seashore : मुंबईच्या मरिन ड्राइव्ह येथील समुद्रात एका २३ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आला आहे. ममता कदम (वय २३) असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ममता अंधेरी येथील रहिवाशी होती व आयटी कंपनीत कामाला होती. तरुणीची लॅपटॉप बॅग आणि मोबाईलची तपासणी केल्यानंतर तिची ओळख पटली. तरुणीने वैयक्तिक कारणास्तव आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. 

मुंबईतील मरिन ड्राइव्ह येथील समुद्रात एक तरुणी समुद्रात बुडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मरिन ड्राइव्ह पोलीस आणि अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तरुणीला समुद्रातून बाहेर काढले. तिला जवळच्या जी.टी. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. 

या तरुणीनं आपली बॅग समुद्रकिनारी सोडून पाण्यात उडी घेतली होती. बॅगमध्ये सापडलेल्या ओळखपत्रानुसार तिचे नाव ममता प्रवीण कदम असल्याचे समोर आले आहे. ममता एका प्रसिद्ध आयटी कंपनीत कामाला होती. कामावर जात असल्याचं सांगून ती घराबाहेर पडली होती. पण कामावर न जाता ती मरिन ड्राइव्हवर आली. तेथील इंटरकॉन्टीनेंटल हॉटेल समोर तिनं समुद्रात उडी घेतली. समुद्रात उडी घेण्याआधी तिने बॅग काढून ठेवली. या बॅगेत तिचा लॅपटॉप, मोबाइल, दागिने होते.  समुद्रात बुडाल्याने तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तरुणीला पाण्यातून बाहेर काढले. पोलिसांना तरूणीच्या बॅगमध्ये मोबाईल सापडला. त्यातील व्हॉट्सॲप चॅटींगवरून तिचे आत्महत्येचे कारण समोर आले आहे. वैयक्तिक कारणास्तव तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

चिपळूणमध्ये भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू –

चिपळूणमधील डीबीजे कॉलेजचा विद्यार्थी सिद्धांत प्रदीप घाणेकर (वय १९) हा शुक्रवारी बेपत्ता झाला होता. मात्र, त्याचा मृतदेह हा शनिवारी कॉलेजच्या सीमाभिंतीच्या ढिगाऱ्याखाली आढळला. मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील देगाव (दापोली) येथील असलेला सिद्धांत घाणेकर हा डीबीजे महाविद्यालयात संगणक शास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी चिपळूणजवळील लोटे गावात मामाकडे राहत होता.  कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर