मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai news : नायलॉन मांजाने केला घात! दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा गळा कापल्याने मृत्यू; एक जखमी

Mumbai news : नायलॉन मांजाने केला घात! दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा गळा कापल्याने मृत्यू; एक जखमी

Jan 16, 2024 09:08 AM IST

boy dies due to nylon manja in mumbai : मुंबईतील बोरवली येथे दुचाकीवरुन जाणाऱ्या एका तरुणाचा गळा नायलॉन मांजामुळे कापल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा दुचाकीवरील सहकारी हा गंभीर जखमी झाला आहे

Pune Nylon Manja News
Pune Nylon Manja News

boy dies due to nylon manja in mumbai : मुंबईत रविवारी नायलॉन मांजामुळे एक धक्कादायक घटना घडली आहे. एक २१ वर्षीय तरुण हा दुचाकीवरुन जात असतांना अचानक त्याच्या भोवती एका पतंगाचा नायलॉन मांजा गुंडाळला गेल्याने त्याचा गळा कापला गेला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर त्याचा दूसरा मित्र हा जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ति विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच दिवशी दुसऱ्या एका घटनेत आणखी एका दुचाकीस्वार नायलॉन मांजामुळे जखमी झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ayodhya Ram Mandir : प्रभू श्री रामाच्या जयघोषाने अयोध्या नगरी दूमदुमली! राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात

मोहम्मद सेफ फारुखी (वय २१) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दुसऱ्या एका घटनेत विलेपार्ले येथे जालिंदर नेमाने हा युवक गंभीर जखमी झाला आहे. या पूर्वी २४ डिसेंबर रोजी नायलॉन मांजामुळे पोलीस हवालदार समीर जाधव यांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार धारावीचे रहिवासी असलेला फारुकी हा त्याचे काम संपवून मित्र हमीद रहमतसोबत दुचकिवून घरी परत येत होता. यावेळी ही दुर्घटना घडली. फारुकी हा शिक्षण घेत असून या व्यतिरिक्त तो त्याच्या काकांना एसी दुरुस्तीच्या व्यवसायात मदत करत असत. रविवारी तो चारकोप येथे एसी दुरूस्तीसाठी जात असतांना काळाने त्याच्यावर घाला घातला.

Maharashtra Weather Update : उत्तर भारतात थंडीचा कहर सुरूच! महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती काय ? आयएमडीने दिला हा अलर्ट

दुपारी २.४५ च्या सुमारास, दोघेही बोरिवली पश्चिम ते पूर्वेला जोडणाऱ्या करिअप्पा उड्डाणपुलावरुण जात होते. यावेळी फारुकीच्या गळ्यात अचानक मांजा अडकला. यामुळे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. हेल्मेट घातलेल्या फारुकीचा गळा मांजामुळे चिरला गेला. तर त्याचा मित्र जखमी झाला. त्याने रिक्षा  थांबवून फारुकीला एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, त्याला तेथे घेण्यास डॉक्टरांनी नकार दिला. त्यांतर त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी फारुकीला तपासून त्याला मृत घोषित केले.

दुसऱ्या एका घटनेत, विलेपार्ले येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर दुचाकीवरून घरी जात असतांना जलींदर नेमाने (वय ४१) हे नायलॉन मांजामुळे जखमी झाले. नेमाने हे एका खासगी कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून काम करतात. ही घटना घडली तेव्हा ते   घरी जात होते. नेमाने यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. नायलॉन मांजावर प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग