मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dengue : कल्याणमध्ये अभियंता तरुणीचा डेंग्यूने मृत्यू

Dengue : कल्याणमध्ये अभियंता तरुणीचा डेंग्यूने मृत्यू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 07, 2023 05:05 PM IST

Girl death due to dengue : तरुणीला गेल्यापाच दिवसांपासून खूप ताप येत होता. डोके दुखत होते. त्यामुळे तिलातात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

dengue
dengue

कल्याणमध्ये एका २१ वर्षीय अभियंता तरुणीचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने पालिका परिसरात खळबळ माजली आहे. ही तरुणी कल्याण जवळील मोहने येथे रहात होती. तरुणीला गेल्या चार ते पाच दिवसांपासून ताप येत होता. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या शरीरातील रक्त घटकाचे प्रमाण कमी झाल्याने आणि तिला डेंग्यु झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

प्राची भास्कर तरे असे मृत तरुणीचे नाव आहे. तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची दखल  पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली असून तरुणी राहत असलेल्या परिसरात घरोघरी नागरिकांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. या भागात जंतुनाशक, धूर फवारणी केली जात आहे.  मृत तरुणी अभियंता होती. तिचा डेंग्युने मृत्यू झाल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे, मात्र पालिकेकडून डेंग्यूने मृत्यू झाल्याचे जाहीर केलेले नाही. तरुणीवर उपचार करणाऱ्या रुग्णालयाकडून तसेच तिच्या कुटुंबीयांकडून वैद्यकीय उपचारांची माहिती पालिकेने मागविली आहे. त्यात तिचा मृत्यु डेंग्यु किंवा अन्य काही कारणाने झाला आहे का, याची माहिती पालिका घेत आहे. 

कुटूंबाने सांगितले की, प्राचीला गेल्या पाच दिवसांपासून खूप ताप येत होता. डोके दुखत होते.  त्यामुळे तिला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना प्राचीची तब्येत खालावत गेली व त्यातच तिचा मृत्यू झाला. तिच्या शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्याचे आणि तिला डेंग्युची बाधा झाला असल्याचे तपासणीत समोर आले होते. 

WhatsApp channel

विभाग