मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  HSC 2024 Exams: बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार वाढला, राज्य मंडळाने जाहीर केलेले आकडे धक्कादायक!

HSC 2024 Exams: बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार वाढला, राज्य मंडळाने जाहीर केलेले आकडे धक्कादायक!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 08, 2024 08:29 AM IST

HSC Exam 2024 Cheating Cases: राज्य मंडळाच्या आकडेवारीनुसार, २१ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या एचएससी परीक्षेत आतापर्यंत २३४ फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

HSC exam cheating cases
HSC exam cheating cases

HSC 2024 Exams: बारावीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केलेल्या कठोर उपाययोजनांचा अपेक्षित परिणाम होऊ शकलेला दिसत नाही, कारण २०२३ च्या तुलनेत यंदा गैरप्रकाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि व्होकेशनल शाखेची बारावीची परीक्षा १९ मार्चपर्यंत चालणार आहे. मात्र, आतापर्यंत २३४ गैरप्रकाराच्या घटना घडल्या आहेत.  २०२३ मध्ये परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी २४७ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०२३ मध्ये राज्यभरात प्रश्नपत्रिका फुटल्याच्या, शिक्षकांनी कॉपी मटेरियल पुरवून विद्यार्थ्यांना मदत केल्याच्या अनेक घटना घडल्या आणि एचएससी परीक्षेदरम्यान एफआयआर दाखल करण्यात आले. २०२४ च्या आकडेवारीनुसार, रसायनशास्त्र आणि राज्यशास्त्राच्या पेपरसाठी सर्वाधिक- ५४ , फिजिक्सच्या पेपरसाठी- ५० आणि बायोलॉजी आणि हिस्ट्रीच्या पेपरसाठी ४८ गैरप्रकाराचे गुन्हे दाखल करण्यात आले.

Ulhasnagar News : उल्हासनगरमधील अनधिकृत बांधकामे नियमित होणार; पुढील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता

यंदा एचएससी आणि एसएससी परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह राज्य मंडळातर्फे कॉपीमुक्त मोहीम राबविण्यात येत आहे. कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात आली. परीक्षा केंद्रांवर फ्लाइंग स्क्वॉड आणि दक्षता पथके वाढविण्यात आली.

Pune Cyber Crime : ऑनलाइन रेटिंग जॉबच्या नादात फसला; तरुणाला ४३ लाख ८२ हजारांचा गंडा

सध्या सुरू असलेल्या बोर्डाच्या परीक्षांसाठी आम्ही प्रत्येक विभागावर लक्ष ठेवून असून गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल, असे एमएसबीएसएचएसईचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.

IPL_Entry_Point

विभाग