Latur Food Poisoning News: लातूर येथील देवणी तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात जेवल्यानंतर २०० जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. यातील सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची सांगितले जात आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर येथील देवणी तालुक्यात वाघनाळवाडी येथे हरिनाम सप्ताह सोहळ्यात गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास भगर देण्यात आली होती. मध्यरात्रीपर्यंत सुमारे २०० जणांनी अस्वस्थतेची तक्रार केली आणि अनेकांना उलट्या होऊ लागल्या. काहींवर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि काही जणांवर मंदिरातील तात्पुरत्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. सध्या कुणाचीही प्रकृती गंभीर नसून परिस्थिती नियंत्रणात आल्याचे वडगावे यांनी सांगितले.
नागपूर येथील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर, चार जण जखमी झाले. मनू तुळशीराम राजपूत (वय, ५०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
सक्करदरा पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील रेशीमबाग येथे भाजपतर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बांधकाम मजुरांना भांडी वाटप करण्यात आली. यामुळे कार्यक्रमास्थळी मोठी गर्दी उसळली. त्यानंतर चेंगराचेंगरी झाल्याने मनू तुळशीराम राजपूत जखमी झाल्या. त्यांना त्वरीत जवळील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.