खळबळजनक ! हवेतच संपलं विमानाचं इंधन; एअर इंडियाचे २०० प्रवासी थोडक्यात बचावले, लखनौमध्ये इमर्जन्सी लँडिंग
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  खळबळजनक ! हवेतच संपलं विमानाचं इंधन; एअर इंडियाचे २०० प्रवासी थोडक्यात बचावले, लखनौमध्ये इमर्जन्सी लँडिंग

खळबळजनक ! हवेतच संपलं विमानाचं इंधन; एअर इंडियाचे २०० प्रवासी थोडक्यात बचावले, लखनौमध्ये इमर्जन्सी लँडिंग

Updated Oct 29, 2024 08:15 AM IST

Air India Plane Emergency Landing : लखनौमध्ये एयर इंडियाचे २०० प्रवासी थोडक्यात बचावले. या विमानाचे इंधन हवेतच संपल्याने लखनौ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

हवेतच संपलं विमानाचं इंधन; एअर इंडियाच्या २०० प्रवासी थोडक्यात बचावले, लखनौमध्ये इमर्जन्सी लँडिंग
हवेतच संपलं विमानाचं इंधन; एअर इंडियाच्या २०० प्रवासी थोडक्यात बचावले, लखनौमध्ये इमर्जन्सी लँडिंग

Air India Plane Emergency Landing : मेडे, मेडे कमी इंधन...! एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये सोमवारी संध्याकाळी एका विमानाच्या पायलटचा हा मेसेज ऐकू येताच एयर ट्रॅफिक कंट्रोल नियंत्रकांना घाम फुटला. अचानक उद्भवलेली ही आणीबाणी स्थिती होती. हवेतच इंधन संपल्याने एअर इंडियाचे विमान दोन वेळा प्रयत्न करूनही धावपट्टीवर उतरू शकले नाही. वैमानिकाने मोठ्या धाडसाने व धिराने परिस्थिती हाताळत हे विमान लखनौ विमानतळावर सुखरूप उतरलवं. या घटनेत विमानातील तब्बल २०० प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला.  

एअर इंडियाचे एआय ४३१ हे विमान दररोज  दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी दिल्लीहून उड्डाण करून   तर दुपारी दीड वाजता लखनौ विमानतळावर उतरते. सोमवारी हे विमान नियोजित वेळेत लखनौला पोहोचले. वैमानिकाने ही विमान धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न केला. विमानाची चाके धावपट्टीवर आदळली. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे त्याने पुन्हा विमान हवेत घेतले. यानंतर पुन्हा ही विमान खाली धावपट्टीवर उतरवण्याचा प्रयत्न वैमानिकाने केला. मात्र, हा प्रयत्न देखील यशस्वी झाला. दरम्यान, ही विमान हवेत उडत राहिले. आणि काली वेळातच या विमानाचे इंधन संपल्याने गोंधळ उडाला. वैमानिकाने तातडीने एयर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली. यामुळे विमानतळावर देखील आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.  

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैमानिक योग्य  मार्ग स्वीकारू शकला नाही. अशा परिस्थिती  विमान धावपट्टीवर उतरवणे धोकादायक ठरू शकते. दरम्यान, पुन्हा उड्डाण घेतल्यावर विमान हवेत बराच वेळ फरत राहिले. व यानंतर पुन्हा विमान तळावर लॅंडींगची प्रक्रिया वैमानिकाने सुरू केली. मात्र, याच दरम्यान, इंधन संपल्याने  पायलटने एटीसीला इमर्जन्सी लँडिंगसाठी इमर्जन्सी मेसेज पाठवला.

विमान तळावर दाखल झाल्या अग्निशामक दलाच्या गाड्या 

विमानतळावर आपत्कालीन लँडिंगची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या, अग्निशमन दल, बचाव कर्मचारी आणि रुग्णवाहिका धावपट्टीवर तातडीने दाखल झाल्या. तसेच मोठ्या संख्येने वैद्यकीय कर्मचारी तैनात करण्यात आले . अखेर तिसऱ्या प्रयत्नात विमान सुखरूप धावपट्टीवर उतरले. धावपट्टीवर पोहोचताना विमानाचे इंजिन चालू  राहिले. यावरून विमानातील इंधन पूर्णपणे संपले नव्हते. 

विमानातील इंधन संपणे धोकादायक स्थिती 

मे २०२० मध्ये पाकिस्तानच्या जिना विमानतळावर उतरणारे आंतरराष्ट्रीय विमान क्रॅश झाले होते. या घटनेत १०१ जणांचा मृत्यू झाला होता. कारण विमानाचे इंधन संपले आणि धावपट्टीवर पोहोचण्यापूर्वीच ते एका इमारतीवर आदळले. त्यामुळे या घटनेत देखील २०० प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर