Bus and Car Collision on Ahmednagar- Kalyan Highway: नगर- कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा येथे भरधाव बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आळेफाट्यावरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या बसने समोरून येणाऱ्या कारला धडक दिली. ही धडक इतकी होती की, दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, रिया गायकर आणि कुसुम शिंगोटे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलांचे नाव आहे. या दोघेही अहमदनगर जिल्ह्यातील कळंब येथील रहिवासी आहेत. तर, काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी ओतूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी रस्त्यावरील आकराळे फाट्याजवळ बस आणि कारमध्ये भीषण अपघात घडला. या अपघातानंतर दोन्हीही गाड्यांनी अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत बस आणि कार आगीत जळून खाक झाले. या अपघातात कारमधील दोन जणांचा मृत्यू झाला.