Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार पुलावरून खाली कोसळल्यानं दोघांचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार पुलावरून खाली कोसळल्यानं दोघांचा मृत्यू

Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार पुलावरून खाली कोसळल्यानं दोघांचा मृत्यू

Published Nov 25, 2024 09:05 PM IST

Mumbai Goa Highway Accident: मुंबई- गोवा महामार्गावर कार पुलावरून खाली कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात
मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात

Mumbai Goa Highway Accident News: मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात घडला. कार पुलावरून खाली कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हा अपघात नेमके कशामुळे घडला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समजू शकलेली नाही.परंतु, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला, असा अंदाज व्यक्त करण्यात आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- गोवा महामार्गावर इंदापूर नजीक वावे दिवाशी गावाजवळ हा अपघात घडला. अपघातग्रस्त कार कोकणातून मुंबईच्या दिशेने येत होती. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या कारमधून एकूण तीन जण प्रवास करीत होते. त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

रस्ते अपघातात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर?

देशात गेल्यावर्षी १ लाख ७० हजारांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तर, ४ लाख ६३ हजार लोक जखमी झाले आहेत. २०२२ च्या तुलनेत ही संख्या ४ टक्क्यांनी वाढली आहे. देशात दर तीन मिनिटाला एकाचा रस्ते अपघातात मृत्यू होत आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रासह एकूण २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये वाढ रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे, यात उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम आणि तेलंगणा यांसारख्या राज्याचा समावेश आहे.

देशात सर्वाधिक अपघाती मृत्युंची नोंद कुठे?

देशात सर्वाधिक अपघाती मृत्युंची नोंद तामिळनाडूत (१८ हजार ३४७) करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात २०२३ मध्ये १५ हजार ३६६ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. तर, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये अनुक्रमे १३ हजार ७९८ आणि १२ हजार ३२१ हजार मृत्युची नोंद झाली. तामिळनाडूत जखमींची (७२ हजार २९२) संख्या मोठी आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर