मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

May 19, 2024 01:00 PM IST

Porsche hits two-wheeler In Pune: पुण्यात लक्झरी पोर्श कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात हा अपघात झाला.
पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात हा अपघात झाला.

Pune Accident News Today: पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात लक्झरी पोर्श कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक पुरुष आणि एक महिला अशा दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास बॉलर पबजवळ हा अपघात घडला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक अल्पवयीन असून तो एका नामांकित रिअल इस्टेट डेव्हलपरचा मुलगा आहे. पुणे शहराचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलाने मद्यपान केले आहे की नाही? याची खातरजमा करण्यासाठी आम्ही त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात उपस्थित लोककारचालकाला मारहाण करताना दिसतआहेत.अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांनी त्याला अडवले आणि त्याला मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले. अनीस अवध्ये आणि अश्विनी कोस्टा अशी मृतांची नावे आहेत. एका रेस्टॉरंटमधून परतत असताना कल्याणीनगर भागात लक्झरी पोर्श कारने त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.

पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, पुण्यात बार, पब, रेस्टॉरंट आणि रूफटॉप हॉटेल रात्री एक वाजल्यानंतर बंद करायचे आहेत. मात्र, तरीही अनेक भागांत बार आणि रेस्टॉरंट रात्री उशीरापर्यंत सुरू ठेवले जात आहेत.

जळगाव: भरधाव कारची दुचाकीला धडक, चौघांचा मृत्यू

जळगाव येथील रामदेववाडी गावाजवळ भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत एका महिलेसह तिच्या तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. राणी सरदार चव्हाण (३०), सोमेश सरदार चव्हाण (वय, २), सोहन सरदार चव्हाण (वय, ७), आणि लक्ष्मण भास्कर राठोड (वय,१२) अशी मृतांची नावे आहेत. अपघात इतका भीषण होता की आलिशान कारच्या धडकेनंतर दुचाकीचा चक्काचूर झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी रास्ता रोको करत दगडफेकही केली.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग