arnala beach drowning : अर्नाळा बीचवर फिरायला गेला; पाण्यात मस्ती करताना लाटेनं खेचून नेला! तरुणाचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  arnala beach drowning : अर्नाळा बीचवर फिरायला गेला; पाण्यात मस्ती करताना लाटेनं खेचून नेला! तरुणाचा मृत्यू

arnala beach drowning : अर्नाळा बीचवर फिरायला गेला; पाण्यात मस्ती करताना लाटेनं खेचून नेला! तरुणाचा मृत्यू

Updated Jun 11, 2024 04:10 PM IST

19-year-old drowns near Arnala beach: विरारमधील अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मित्रांसोबत फिरायला गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर पाण्यात बुडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर पाण्यात बुडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

arnala beach drowning news : विरारमधील अर्नाळा येथे रविवारी सायंकाळी समुद्रात उतरलेला १९ वर्षीय तरुण उंच लाटेत वाहून गेला. देवराई राय असे या तरुणाचे नाव असून तो मित्रांसोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेला होता. मित्रांसोबत पाण्यात मस्ती करत असताना उसळलेल्या लाटेने त्याला पाण्यात खेचून नेले, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने सांगितली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली.

उसळलेल्या लाटेमुळे सर्व मित्रांनी एकमेकांना पाण्यात मदत करण्याचा प्रयत्न केला, पण राय वाहून गेला. या घटनेची माहिती त्याच्या वडिलांना देण्यात आली आणि त्यांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर परिसरातील रहिवाशांच्या प्रयत्नातून राय याला पाण्यातून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वयाच्या १९ व्या वर्षी घरातील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने राय कुटुंबावर दुख:चे डोंगर कोसळले आहे.

पर्यटकांना समुद्रात जाऊ नये, पोलिसांचे आवाहन

पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू असल्याचे सांगितले. समुद्रकिनारे प्रवाशांसाठी धोकादायक मानले जात असून विशेषत: जीवरक्षक नसताना पर्यटकांनी समुद्रात जाण्याची शक्यता टाळावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर बोट उलटून एकाचा मृत्यू

याआधी अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला. तर, ११ जणांना वाचवण्यात यश आले. ही घटना २९ मे २०२४ रोजी घडली. विरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरारच्या अर्नाळ्याजवळ हे मजूर अवैध वाळू उपसा करत होते. दुर्घटनाग्रस्त बोट १२ मजुरांना घेऊन वाळू उपसा करण्यासाठी अर्नाळा किल्ल्याच्या दिशेने निघाली. मात्र, अर्ध्या मैलानंतर जाताच अचानक त्यांची बोट उलटली. तटरक्षक दलाला बोट बुडताना दिसल्यानंतर त्यांनी गोताखोरांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. तीन तासांत अकरा मजुरांची सुटका करण्यात आली. मात्र, एकाचा मृत्यू झाला. संजय शांताराम मुकणे (वय, ३०) असे समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर