Mumbai Suicide: इमारतीच्या २३व्या मजल्यावरून उडी घेत तरुणीची आत्महत्या, मुंबईतील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Suicide: इमारतीच्या २३व्या मजल्यावरून उडी घेत तरुणीची आत्महत्या, मुंबईतील घटना

Mumbai Suicide: इमारतीच्या २३व्या मजल्यावरून उडी घेत तरुणीची आत्महत्या, मुंबईतील घटना

Oct 23, 2024 07:42 AM IST

Mumbai Girl Student Suicide: मुंबईतील मालाड परिसरात एका तरुणीने निवासी इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.

मुंबई: मालाडमध्ये तरुणीची आत्महत्या
मुंबई: मालाडमध्ये तरुणीची आत्महत्या

Mumbai News: मुंबईच्या मालाड परिसरात मंगळवारी धक्कादायक घटना घडली. एका १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने निवासी इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

रिद्धी सुरेखा (वय, १९) असे निवासी इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. रिद्धी ही मालाड पश्चिम येथे कुटुबांसोबत राहत होती आणि पोतदार कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिद्धी मंगळवारी दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास कॉलेजमधून परतली आणि इमारतीच्या टेरेसवर गेली. त्यानंतर तिने तिथून उडी घेत आत्महत्या केली. टेरेसवर तिची बॅग सापडली. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट न सापडल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. तिचे वडील शेअर मार्केटमध्ये काम करतात.

पुणे: धावत्या रेल्वेसमोर दोघांची उडी

पुणे रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन महिलेसह एका पुरुषाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. ही घटना ६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे पुणे स्थानकावरून यार्डच्या दिशेने जात असताना दोघेही रेल्वे रुळावर झोपल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दोन मृत व्यक्तींच्या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. परंतु, दोघेही ४० वयोगटातील आहे. रेल्वे पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासात असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा

भारतात आत्महत्या करणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा लोक मानसिक तणावातून आत्महत्येचा निर्णय घेतात. मात्र, आत्महत्या कोणत्याही समस्येचे निवारण ठरू शकत नाही. यामुळे कोणतीही समस्या किंवा अडचण असेल तर, सर्वात प्रथम आत्महत्येचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाका. तसेच समस्यावर कसा तोडगा काढता येईल? याकडे लक्ष द्या. याशिवाय, आपल्याकडून नकळत कोणतीही चूक झाली असेल तर, घाबरू नका. घरातील मोठ्या आणि जवळच्या व्यक्तींसमोर मन मोकळे करा, ते नक्कीच तुमची मदत करतील.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर