मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  sharad pawar : राज्यातील १९ जिल्ह्यांत भयंकर दुष्काळ, सरकार जागं नाही झालं तर…; काय म्हणाले शरद पवार?

sharad pawar : राज्यातील १९ जिल्ह्यांत भयंकर दुष्काळ, सरकार जागं नाही झालं तर…; काय म्हणाले शरद पवार?

May 24, 2024 05:11 PM IST

Sharad Pawar on drought Situation : शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यातील दुष्काळी परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. राज्य सरकारनं या प्रश्नाकडं तातडीनं लक्ष द्यावं, अन्यथा इतर मार्ग आहेत, असा इशारा त्यांनी दिला.

राज्यातील १९ जिल्ह्यांत दुष्काळ भयंकर दुष्काळ, सरकार कुठंय?; शरद पवारांचा सवाल
राज्यातील १९ जिल्ह्यांत दुष्काळ भयंकर दुष्काळ, सरकार कुठंय?; शरद पवारांचा सवाल

Sharad Pawar on drought Situation : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यातील युती सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठवणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडं त्यांनी सरकारचं लक्ष वेधलं आहे. राज्यातील १९ जिल्ह्यात तीव्र दुष्काळ आहे. जवळपास ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. मात्र राज्य सरकारचं तिकडं लक्षच नाही. आम्ही या प्रश्नाकडं सरकारचं लक्ष वेधत आहोत. तरीही सरकार जागं झालं नाही, तर इतर मार्ग आहेत, असा इशारा शरद पवार यांनी आज दिला.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडं राज्यकर्त्यांचं लक्ष नाही. राज्यात पावसाची स्थिती गंभीर आहे. एकूण १९ जिल्हे व त्यातले ४० तालुके गंभीर दुष्काळग्रस्त आहेत तर १६ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे. ही परिस्थिती जून अखेरपर्यंत राहिल्यास राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण होण्याची शक्यता आहे, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली.

दुष्काळी भागात मागणीपेक्षा कमी पाणीपुरवठा

राज्यात ज्या ठिकाणी भीषण दुष्काळ आहे, तिथं मागणीपेक्षा कमी पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळं लोकांची वणवण होत आहे. महाराष्ट्रात एकंदर २,२९२ मंडळं आहेत, यातील १५०० मंडळात दुष्काळ राज्यात जाहीर करण्यात आला आहे. यापैकी मराठवाडा आणि पुण्यातील काही भागात गंभीर परिस्थिती आहे. देशभरात सर्वाधिक धरणं महाराष्ट्र राज्यात आहेत परंतु यातला साठ्याचा विचार केला तर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, याकडं त्यांनी लक्ष वेधलं.

कृषीमंत्र्यांचा जिल्हा दुष्काळी, पण तेच बैठकीला नसतात!

मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पामध्ये ५.५० इतकाच जलसाठा शिल्लक आहे तर अनेक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यातील धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर या मोठ्या प्रकल्पामध्ये पाच टक्क्यांहून खाली पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. कृषीमंत्र्यांचा जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु कृषी मंत्रीच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या दुष्काळाच्या कालच्या बैठकीला हजर नसतील तर ही गंभीर बाब आहे. सरकारमधील फक्त दोनच पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहत असतील तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

राज्यात १०,५७२ टँकरनं पाणीपुरवठा

छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्र, पुणे विभागतील परिस्थिती चिंताजनक आहे. संभाजीनगरमधील धरणांमध्ये १० टक्के पाणी आहे. तर, पुणे विभागातील धरणांमध्ये ३५ टक्के, नाशिकमधील धरणांमध्ये टक्के २२ पाणी आहे, असं सांगत, या विभागात किती टँकर सुरू आहेत याची आकेडवारीच त्यांनी दिली. संभाजीनगरमध्ये १८६७, पुण्यामध्ये ६३२ गाव आणि वाड्यामध्ये ७५५ टँकर सध्या लागत आहेत. राज्यभरात यंदा १०, ५७२ टँकर सुरू आहेत. मागील वर्षी १,१०८ टँकर लागत होते. यावरून स्थितीचं गांभीर्य लक्षात येईल, असं ते म्हणाले.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग