मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : धक्कादायक! कामसूत्राचे फोटो दाखवून शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

Pune Crime : धक्कादायक! कामसूत्राचे फोटो दाखवून शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Nov 23, 2022 01:45 PM IST

Girl molested by teacher in Pune : पुण्यात मुलींवरील आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. चित्रकलेचे शिक्षण देणाऱ्या एका शिक्षकाने एका विद्यार्थिनीला कामसूत्रचे फोटो दाखवून विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

pune crime
pune crime (HT_PRINT)

पुणे : पुण्यात मुलींवरील अत्याचारांच्या घटना या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गुरुशिश्याच्या नात्याला काळीमा फसणारी एक घटना उघकडकीस आली आहे, चित्रकलेचे शिक्षण देणाऱ्या एका शिकक्षकाने त्याच्या कडे येणाऱ्या १६ वर्षीय मुलीला तू मला आवडतेस, तू केस मोकळे सोडून येत जा असे म्हणत तिला कामसूत्राचे फोटो दाखवत तिचा विनयभंग केला, या प्रकरणी चतुशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

निलेश नानासाहेब पवार (वय ४९, रा. भगवती नगर सुतारवाडी पाषाण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी १६ वर्षीय मुलीने तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही नीलेश पवार याच्याकडे चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी जात होती. त्याचा पाषाण परिसरात आर्ट स्टुडिओ आहे. सुरवातीला काही दिवस शिक्षकाने योग्य मार्गदर्शन केले. मात्र, त्यानंतर त्याने त्याचा खरा रंग दाखवण्यास सुरुवात केली. १६ नोव्हेंबरला पीडित मुलगी ही स्टुडिओमध्ये एकती होती. यावेळी आरोपी पवारने तिच्या पायाला जाणीव पूर्वक तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने हात लावला. यानंतर त्याने स्टुडिओच्या दरवाजा बंद करून घेतला. पिडीला यावेळी त्याने त्याच्या मोबाइल मधील कामसूत्राचे फोटो दाखवले. आरोपी शिक्षक हा एवढ्यावरच नाही थांबला तर त्याने काही दिवसांनंतर मुलीला पकडत 'तू केस मोकळे सोडत जा, सुंदर दिसतेस, आय लव्ह यु' म्हणत तिचा विनयभंग केला. यानंतर हा प्रकार सहन न झाल्याने मुलीने हा प्रकार घरी सांगितला. यानंतर थेट घरच्यांनी चतु:शृंगी पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार दिली, यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या