निर्घृणतेचा कळस असणारे ते १५ व्हिडिओ आणि ८ फोटोंनी धनंजय मुंडे अडकले, द्यावा लागला राजीनामा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  निर्घृणतेचा कळस असणारे ते १५ व्हिडिओ आणि ८ फोटोंनी धनंजय मुंडे अडकले, द्यावा लागला राजीनामा

निर्घृणतेचा कळस असणारे ते १५ व्हिडिओ आणि ८ फोटोंनी धनंजय मुंडे अडकले, द्यावा लागला राजीनामा

Published Mar 04, 2025 02:44 PM IST

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विरोधक आणि देशमुख कुटुंबीय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. मात्र, देशमुख यांच्यावर झालेल्या अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंडे यांनी राजीनामा दिला.

धनंजय मुंडे (X)
धनंजय मुंडे (X) (HT_PRINT)

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. डिसेंबरमध्ये सरपंच देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. त्याचबरोबर आरोपींनी १५ व्हिडिओ ही बनवले होते जे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते. याशिवाय ८ फोटो आणि २ व्हिडिओ कॉल समोर आल्यानंतर लोक संतापले. महाराष्ट्र सरकारला दुसरा कोणताही पर्याय दिसत नसल्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयावर सरपंचाच्या हत्येचा आरोप होता.

सीआयडीने आपल्या आरोपपत्रात व्हिडिओ आणि फोटोंचाही समावेश केला होता. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहा साथीदारांना महाराष्ट्र पोलिसांनी जानेवारी महिन्यात अटक केली होती. बीड कोर्टात हे व्हिडिओ दाखवण्यात आले होते. फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर बीडमध्ये जनताही रस्त्यावर उतरली. नागरिकांनी मंगळवारी एक दिवसाचा बंद पुकारला आहे. त्याचवेळी धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. विरोधी पक्ष आणि सरपंच कुटुंबीय अनेक दिवसांपासून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. मात्र, व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत मुंडे आपल्या मंत्रीपदाला चिटकून होते.

बीडचे आमदार संदिर क्षीरसागर म्हणाले, 'बीडच्या जनतेने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तणाव निर्माण झाला. लोक घराबाहेर पडून रस्त्यावर उतरले. मुंडे यांनी राजीनामा दिला हे चांगले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अत्याचाराचे व्हिडिओ तयार करण्यात आले होते. बीडचे एसपी म्हणाले, पोटो व्हायरल झाल्यानंतर लोक आंदोलन करत आहेत. हे व्हिडिओ आणि पोटो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहेत. मी जनतेला आवाहन करतो की, कायदा हातात घेऊ नका.

कराड यांनी बीडमधील अवाडा या अक्षय ऊर्जा कंपनीच्या भूसंपादन अधिकाऱ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. सरपंच देशमुख यांनी खंडणी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले. एसआयटीने सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ कॉल, कॉल रेकॉर्डिंग आणि छायाचित्रे न्यायालयात सादर केली होती. कराडनंतर सुदर्शन घुले हा दुसरा आरोपी असल्याचे बोलले जात होते. त्याच्यावर आधीच डझनभर गुन्हे दाखल आहेत. हत्येनंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आला होता.

आपले चुलत बंधू धनंजय मुंडे यांचे कोणतेही काम कराडशिवाय चालत नाही, असे खुद्द पंकजा मुंडे यांनी म्हटले होते. आरोपपत्रानुसार, आरोपी महेश केदार याने व्हिडिओ शूट केला होता. हे व्हिडिओ २ सेकंद ते २ मिनिटे ४ सेकंदापर्यंतचे होते. एका व्हिडिओमध्ये सुदर्शन घुले आणि इतर पाच आरोपी देशमुख यांना काठीने मारहाण करताना दिसत आहेत. ते त्यांना लाथाही मारत होते. या व्हिडिओमध्ये देशमुख अर्धनग्न अवस्थेत असून त्यांना जमिनीवर बसून मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे.

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आरोपी सुदर्शन घुले संतोषला आपण सर्वांचे वडील असल्याचे जबरदस्तीने सांगताना दिसत आहे. आणखी एका आरोपीने देशमुख यांच्यावर लघवी केली. देशमुख यांनाही रक्तस्त्राव होत होता. आरोपी कृष्णा आंधळे याने देशमुख यांच्या फोनवरून दोन व्हिडिओ कॉल केले. पोलिसांनी घटनास्थळावरून १५ तुटलेले पाईप जप्त केले. देशमुख यांच्या हत्येपूर्वी घुले, कराड आणि विष्णू चाटे हे एकमेकांच्या संपर्कात होते. देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर