धक्कादायक! १४ वर्षाच्या मुलाची वडिलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडत आत्महत्या, सोलापुरातील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धक्कादायक! १४ वर्षाच्या मुलाची वडिलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडत आत्महत्या, सोलापुरातील घटना

धक्कादायक! १४ वर्षाच्या मुलाची वडिलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडत आत्महत्या, सोलापुरातील घटना

Published Jan 27, 2025 11:39 PM IST

सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाने वडिलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोलापूरमधील माढ्यातून समोर आली आहे.

१४  वर्षाच्या मुलाची डोक्यात गोळी झाडत आत्महत्या
१४  वर्षाच्या मुलाची डोक्यात गोळी झाडत आत्महत्या

सोलापूर जिल्ह्यातील माढा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाने वडिलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या मुलाचे वडील सीमा सुरक्षा दलात निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुलाचे वडील कर्तव्यासाठी राजस्थानमध्ये तैनात आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माढा तालुक्यातील मौजे आढेगाव गावात सोमवारी (२७ जानेवारी) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. श्रीधर गणेश नष्टे (वय १४ ) असे आत्महत्या शाळकरी मुलाचे नाव आहे. श्रीधरचे वडील गणेश नष्टे सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे जम्मू-काश्मीरचे बंदुकीचे लायसन्स आहे. 

वडिलाची घरात ठेवलेली बंदुक घेऊन खुर्चीत बसला व त्याने स्वत:वर गोळी घातली. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र,  खेळता खेळता त्याच्या हातून बंदुकीचा चाप ओढला गेले व ही दुर्घटना घडली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

श्रीधर नष्टे हा इंदापूर तालुक्यातील सराटी येथील जिजामाता प्रशालेमध्ये सातवीच्या वर्गात शिकत होता. तो आजारी असल्याने आज शाळेला गेला होता. त्याला दवाखान्यात नेऊन तपासणी करून आणले होते. डॉक्टरांनी श्रीधरला विश्रांतीचा सल्ला दिला होता. सोमवारी त्याने दुपारच्या सुमारास वरच्या मजल्यावर जाऊन कपाटाततील रिव्हॉल्व्हर बाहेर काढली व गोळी झाडून घेत आत्महत्या केली. 

गोळीबाराचा आवाज एकून घरातील आई, आजोबा धावत आले असता श्रीधर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. श्रीधर याचे वडील गणेश नष्टे राजस्थानमध्ये सीमा सशस्त्र दलात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. श्रीधर आई,  लहान भाऊ,  आजी व आजोबांसह गावी रहात होता. या घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. घराचा पंचनामा केला असता सुसाईड नोट आढळून आली नाही. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर