भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने दोन विद्यार्थ्यांना चिरडले. या धडकेत एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. दारूच्या नशेत असलेल्या टेम्पो चालकाला डोंबिवली मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवलीतील एमआयडीसी मधील कावेरी चौकात बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.
बुध्दशल खंडारे (१६, रा. सोनारपाडा) मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तर वैभव शेंडगे (वय १६) जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. टेम्पो चालकाने मद्य सेवन केल्याचा प्रकार समोर आला आहे. नागरिकांना टेम्पो चालकाला पकडून त्याला बेदम चोप दिला आणि त्यानंतर मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले.
बुध्दशल खंडारे डोंबिवली एमआयडीसीतील एका शाळेचा विद्यार्थी होता. तो इयत्ता दहावीमध्ये शिकत घेत होता. बुध्दशल आणि वैभव यांच्या सहामाही परीक्षा सुरू आहेत. बुध्दशल आणि वैभव दोघे संध्याकाळी खासगी शिकवणीला गेले होते. दुचाकीवरून ते एमआयडीसीतील कावेरी चौकातून जात घरी जात असताना हा अपघात झाला. यावेळी फेरीवाले, पादचाऱ्यांनी गजबजलेल्या कावेरी चौकात एका भरधाव टेम्पोने त्यांना उडवले.
दारू पिऊन चालक टेम्पो चालवत असल्याचे समोर आले आहे. कावेरी चौकात आल्यावर चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले व त्याने दोन मुलांना उडवले. ही धडक इतकी भीषण होती की, बुध्दशलचा जागीच मृत्यू झाला. वैभव टेम्पोच्या धडकेत दूर फेकला गेल्याने तो थोडक्यात बचावला. त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. अपघात होताच नागरिकांनी तात्काळ मानपाडा पोलिसांना कळविले आणि मद्याच्या धुंदीत असलेल्या टेम्पो चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
संबंधित बातम्या