१३०० रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट, महाराष्ट्रातील किती स्टेशन्सचा समावेश आणि काय-काय असणार सुविधा?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  १३०० रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट, महाराष्ट्रातील किती स्टेशन्सचा समावेश आणि काय-काय असणार सुविधा?

१३०० रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट, महाराष्ट्रातील किती स्टेशन्सचा समावेश आणि काय-काय असणार सुविधा?

Published Apr 12, 2025 07:37 PM IST

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये माध्यमांशी बोलताना वैष्णव म्हणाले की, या १३०० स्थानकांपैकी अनेक स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे, त्यापैकी १३२ स्थानके महाराष्ट्रात आहेत.

१३०० रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट
१३०० रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

अमृत भारत योजनेंतर्गत देशभरातील १३०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत असून त्यापैकी १०४ स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी दिली. संपूर्ण रेल्वे नेटवर्कमधील स्थानकांमध्ये सुधारणा आणि आधुनिकीकरण करणे आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविणे हा या योजनेचा उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ मध्ये स्टेशन पुनर्विकास योजनेचे भूमिपूजन केले होते.

महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट -

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये माध्यमांशी बोलताना वैष्णव म्हणाले की, या १३०० स्थानकांपैकी अनेक स्थानकांचा पुनर्विकासाचे काम सुरू असून त्यापैकी १३२ स्थानके महाराष्ट्रात आहेत. मंत्री म्हणाले की, इतर अनेक स्थानकांच्या कामात लक्षणीय प्रगती झाली आहे.

जगात कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टेशन पुनर्विकास प्रकल्प झालेला नाही. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह (सीएसएमटी) जागतिक दर्जाची रेल्वे सुविधा म्हणून विकसित करण्यात येत असलेल्या स्थानकांवर सुरू असलेल्या कामांची छायाचित्रे त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवली.

सीएसएमटी स्टेशनसाठी १८०० कोटी होणार खर्च -

सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम मोठे असून त्यासाठी १८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तो अत्यंत वेगाने सुरू आहे. पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबईतील ब्रिटिशकालीन कॅम्पस लंडनमधील किंग्ज क्रॉस स्थानकापेक्षा अधिक चांगला दिसेल.

काय-काय असणार सुविधा -

वेटिंग रूम, फूड कोर्ट, स्वच्छ स्वच्छतागृहे, लिफ्ट, एस्केलेटर आणि डिजिटल सुविधा अशा आधुनिक सुविधांनी स्टेशन्स सुसज्ज करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. सीएसएमटीव्यतिरिक्त दादर (मध्य आणि पश्चिम), अंधेरी (मुंबई), पुणे, नाशिकरोड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ही महाराष्ट्रातील काही प्रमुख स्थानके या योजनेत समाविष्ट आहेत.

विदर्भातील गोंदिया-बल्लारशाह या २४० किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्र सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली असून, त्यासाठी ४,८१९ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर