konkan railway : पेडणे बोगद्यात पाणी साठल्याने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत; मुंबईहून सुटणाऱ्या १३ एक्सप्रेस गाड्या रद्द
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  konkan railway : पेडणे बोगद्यात पाणी साठल्याने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत; मुंबईहून सुटणाऱ्या १३ एक्सप्रेस गाड्या रद्द

konkan railway : पेडणे बोगद्यात पाणी साठल्याने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत; मुंबईहून सुटणाऱ्या १३ एक्सप्रेस गाड्या रद्द

Jul 10, 2024 12:40 PM IST

konkan railway trains cancelled : कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. रात्री पासून गोव्याला जाणारी वाहतूक ही ठप्प झाली आहे. तर मुंबईवरून गोव्यात जाणाऱ्या १३ एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पेडणे बोगद्यात पाणी साठल्याने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत; मुंबईहून सुटणाऱ्या १३ एक्सप्रेस गाड्या रद्द
पेडणे बोगद्यात पाणी साठल्याने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत; मुंबईहून सुटणाऱ्या १३ एक्सप्रेस गाड्या रद्द (PTI)

Konkan Railway update : कोकणात गेल्या काही दिवसांनपासून जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक जिल्ह्यात पुरसदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. या पावसाचा फटका हा कोकण रेल्वेला बसला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे गोव्यातील पेडणे बोगद्यात माती व चिखल साठला असून त्यामुळे रात्री तीन वाजल्यापासून गोव्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवासी अडकून पडले आहेत. तर मुंबईहून या मार्गावर जाणाऱ्या १३ एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कोकणात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे विस्कळीत झाली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे गोव्यातील पडणे बोगद्यात माती आणि चिखल साचल्याने अनेक गाड्या या सावंतवाडीत खोळंबल्या आहेत. येथील माती आणि चिखल काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या पावसामुळे मुंबई ते मडगाव या कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तर काही गाड्यांचा मार्ग हा बदलण्यात आला आहे.

पावसामुळे आज, चंदीगड एक्सप्रेस १२४४९ मडगाव जंक्शन, १२६२० बंगळुरू सेंट्रलला जाणारी लोकमान्य टिळक एक्सप्रेस, १२१३४ मंगळुरू जंक्शन मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस, ५०१०७ सावंतवाडी रोड एक्सप्रेस, रद्द करण्यात आल्या आहेत. तर १६३४५ लोकमान्य टिळक तिरुअनंतपुरम एक्सप्रेस, २२११३ लोकमान्य टिळक कोचिवल एक्सप्रेस, १२४३२ हजरत निजामुद्दीन तिरुअनंतपुरम एक्सप्रेस या गाड्या राजापूर रेल्वे स्थानकातून पनवेल मार्गे पुणे सोलापूर या मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत.

तर १९२६० भावनगर कोचुवेली एक्सप्रेस ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनतुन मागे पाठवण्यात येणार आहे. तर १२२२४ लोकमान्य टिळक एरणाकुलम एक्सप्रेस चिपळूण रेल्वे स्टेशनमधून मागे वळवण्यात आली आहे. २०९३२ इंदोर जंक्शन कोचिवल्ली एक्सप्रेस, ही गाडी सुरत जळगाव वर्धा या मार्गे वळविण्यात आली आहे. तर रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्ये उभी असलेली भावनगर टर्मिनस कोचीवली एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने मार्गस्त करण्यात आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, मांडवी आणि मंगळुरु एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर