Pimpri Chinchwad News: महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच पिंपरी- चिंचवड येथून एक धक्कादायक माहिती समोर आली. रोड रोमीयोच्या त्रासाला वैतागून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्षितिज लक्ष्मण पराड आणि तेजस पांडुरंग पठारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर,मृत मुलगी १२ वर्षांची असून पिंपरी- चिंडवड येथील भोसरी परिसरात राहत होती. क्षितिज आणि तेजस नेहमीच संबंधित मुलीची येता-जाता छेड काढायचे. सततच्या त्रासाला वैतागून मुलीने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पुण्यात ठेकेदाराच्या त्रासाला वैतागून एका कामगाराने आत्महत्या केल्याची घटना गेल्या महिन्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. ही घटना २८ सप्टेंबर रोजी पुण्यातील वारजे परिसरात घडली. रामविकास जयसिंग चौहान (वय, २६ ) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. तर, सत्येंद्र चौहान असे आरोपी ठेकेदाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामविकासच्या मित्राने सत्येंद्रकडून २५ हजार रुपये ऊसने घेतले होते. परंतु, तो पैसे परत न करताच उत्तर प्रदेशला निघून गेला. यामुळे सत्येंद्र हा रामविकासला शिवीगाळ करत असे. याबाबत रामविकासने त्याच्या आईला माहिती दिली. त्यानंतर सत्येंद्र याने त्याच्या आईलाही शिवीगाळ केली. यामुळे दुखावलेल्या रामविकासने गुरुवारी रात्री चाकूने स्वत: गळ्यावर आणि पोटावर वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. यामुळे उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
भारतात आत्महत्या करणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा मानसिक तणावातून लोक आत्महत्येचा निर्णय घेतात. मात्र, आत्महत्या कोणत्याही समस्येचे निवारण ठरू शकत नाही. यामुळे कोणतीही समस्या किंवा अडचण असेल तर, सर्वात प्रथम आत्महत्येचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाका. तसेच समस्यावर कसा तोडगा काढता येईल, याकडे लक्ष द्या. याशिवाय, आपल्याकडून नकळत कोणती चूक झाली असेल तर, घाबरू नका. घरातील मोठ्या आणि जवळच्या व्यक्तींसमोर मन मोकळे करा, ते नक्कीच तुमची मदत करतील.
संबंधित बातम्या