UNESCO जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले; पाहा फोटो-12 maratha forts nominated by india for unesco world heritage list 202324 ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  UNESCO जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले; पाहा फोटो

UNESCO जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले; पाहा फोटो

UNESCO जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले; पाहा फोटो

Feb 11, 2024 12:46 PM IST
  • twitter
  • twitter
  • Maratha forts nominated by India for UNESCO World Heritage List : भारताने २०२४-२५ च्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाऱ्यांच्या १२ समावेश करण्यात ला आहे. "मराठा मिलिटरी लँडस्केप" अंतर्गत या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे.  
देशाच्या  सांस्कृतिक मंत्रालयाने एक घोषणा करत २०२४-२५ च्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये "मराठा मिलिटरी लँडस्केप" या शीर्षकाखाली छत्रपती शिवरायांचे तब्बल १२ किल्ले या यादीत समाविष्ट केले आहे. हे सर्व किल्ले मराठा साम्राज्याचे  ऐतिहासिक साक्षीदार आहेत.  
share
(1 / 13)
देशाच्या  सांस्कृतिक मंत्रालयाने एक घोषणा करत २०२४-२५ च्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये "मराठा मिलिटरी लँडस्केप" या शीर्षकाखाली छत्रपती शिवरायांचे तब्बल १२ किल्ले या यादीत समाविष्ट केले आहे. हे सर्व किल्ले मराठा साम्राज्याचे  ऐतिहासिक साक्षीदार आहेत.  (Pinterest)
सुवर्णदुर्ग किल्ला: सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील हर्णैजवळ स्थित आहे.  शिवाजी महाराजांनी किनारी प्रदेशांच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधला होता.  
share
(2 / 13)
सुवर्णदुर्ग किल्ला: सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील हर्णैजवळ स्थित आहे.  शिवाजी महाराजांनी किनारी प्रदेशांच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधला होता.  (Pinterest)
विजयदुर्ग किल्ला: विजयदुर्ग किल्ला महाराष्ट्रा आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधून घेतला होता. हा किल्ला भारतातील सर्वात जुन्या आणि मजबूत सागरी किल्ल्यांपैकी एक आहे. याने सागरी व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावली. हा किल्ला त्याच्या  ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखली जातो. 
share
(3 / 13)
विजयदुर्ग किल्ला: विजयदुर्ग किल्ला महाराष्ट्रा आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधून घेतला होता. हा किल्ला भारतातील सर्वात जुन्या आणि मजबूत सागरी किल्ल्यांपैकी एक आहे. याने सागरी व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावली. हा किल्ला त्याच्या  ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखली जातो. (Pinterest)
जिंजीचा किल्ला : तामिळनाडूमध्ये स्थित, जिंजीचा किल्ला त्याच्या स्थापत्य वैभवासाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखला जातो. हा किल्ला  मूळतः चोल राजवंशाने बांधला होता. नंतर विजयनगर साम्राज्य आणि मराठ्यांनी या किल्ल्याचे नूतणीकरण करत त्याला भक्कम केले होते. 
share
(4 / 13)
जिंजीचा किल्ला : तामिळनाडूमध्ये स्थित, जिंजीचा किल्ला त्याच्या स्थापत्य वैभवासाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखला जातो. हा किल्ला  मूळतः चोल राजवंशाने बांधला होता. नंतर विजयनगर साम्राज्य आणि मराठ्यांनी या किल्ल्याचे नूतणीकरण करत त्याला भक्कम केले होते. (Pinterest)
खांदेरी किल्ला: खांदेरी किल्ला महाराष्ट्रातील मुंबईजवळ   आहे आणि अरबी समुद्रातील त्याच्या मोक्याच्या स्थानासाठी हा किल्ला ओळखला जातो. हा किल्ला किनारपट्टीवरील व्यापार मार्गांचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आला होता. 
share
(5 / 13)
खांदेरी किल्ला: खांदेरी किल्ला महाराष्ट्रातील मुंबईजवळ   आहे आणि अरबी समुद्रातील त्याच्या मोक्याच्या स्थानासाठी हा किल्ला ओळखला जातो. हा किल्ला किनारपट्टीवरील व्यापार मार्गांचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आला होता. (Pinterest)
प्रतापगड किल्ला: महाराष्ट्रातील हा किल्ला शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यातील प्रतापगडाच्या लढाईसाठी प्रसिद्ध आहे. या किल्याचे त्या काळी सामरीक महत्व आहे. हा किल्ला वास्तु कौशल्यासाठी देखील ओळखला जातो. 
share
(6 / 13)
प्रतापगड किल्ला: महाराष्ट्रातील हा किल्ला शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यातील प्रतापगडाच्या लढाईसाठी प्रसिद्ध आहे. या किल्याचे त्या काळी सामरीक महत्व आहे. हा किल्ला वास्तु कौशल्यासाठी देखील ओळखला जातो. (Pinterest)
रायगड किल्ला: महाराष्ट्रात स्थित रायगड किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याची राजधानी होती. हा भक्कम किल्ला महा दरवाजा आणि त्याच्या भक्कम  तटबंदीसाठी ओळखला जातो. 
share
(7 / 13)
रायगड किल्ला: महाराष्ट्रात स्थित रायगड किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याची राजधानी होती. हा भक्कम किल्ला महा दरवाजा आणि त्याच्या भक्कम  तटबंदीसाठी ओळखला जातो. (Pinterest)
पन्हाळा किल्ला: महाराष्ट्रात कोल्हापूर येथे असलेला   पन्हाळा किल्ला हा दख्खन प्रदेशातील सर्वात मोठा किल्ला आहे. या किल्ल्याचा  समृद्ध इतिहास आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील हा महत्वाचा किल्ला आहे.  मराठा साम्राज्यात याला किल्ल्याला मोठे महत्व होते.  
share
(8 / 13)
पन्हाळा किल्ला: महाराष्ट्रात कोल्हापूर येथे असलेला   पन्हाळा किल्ला हा दख्खन प्रदेशातील सर्वात मोठा किल्ला आहे. या किल्ल्याचा  समृद्ध इतिहास आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील हा महत्वाचा किल्ला आहे.  मराठा साम्राज्यात याला किल्ल्याला मोठे महत्व होते.  (Pinterest)
 लोहगड किल्ला: महाराष्ट्रात पुण्याजवळ वसलेला, लोहगड किल्ला त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखला जातो. शिवाजी महाराजांनी त्यांचा खजिना साठवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला होता. सध्या हा किल्ला ट्रेकिंगसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. 
share
(9 / 13)
 लोहगड किल्ला: महाराष्ट्रात पुण्याजवळ वसलेला, लोहगड किल्ला त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखला जातो. शिवाजी महाराजांनी त्यांचा खजिना साठवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला होता. सध्या हा किल्ला ट्रेकिंगसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. (Pinterest)
शिवनेरी किल्ला: महाराष्ट्रात पुण्याजवळ स्थित, शिवनेरी किल्ला हे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. हा किल्ला मराठा साम्राज्यासाठी महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक स्थळ आहे. हा किल्ला याच्या मजबूत बांधकामासाठी  आणि स्थापत्य कलेसाठी देखील ओळखला जातो. 
share
(10 / 13)
शिवनेरी किल्ला: महाराष्ट्रात पुण्याजवळ स्थित, शिवनेरी किल्ला हे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. हा किल्ला मराठा साम्राज्यासाठी महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक स्थळ आहे. हा किल्ला याच्या मजबूत बांधकामासाठी  आणि स्थापत्य कलेसाठी देखील ओळखला जातो. (Pinterest)
 साल्हेर किल्ला: महाराष्ट्रात स्थित, साल्हेर किल्ला ऐतिहासिक महत्त्व आणि नैसर्गिक  दृश्यांसाठी ओळखला जातो. हा शिवाजी महाराजांनी १६७१ मध्ये काबीज केला होता. हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच किल्ल्यांपैकी एक आहे. 
share
(11 / 13)
 साल्हेर किल्ला: महाराष्ट्रात स्थित, साल्हेर किल्ला ऐतिहासिक महत्त्व आणि नैसर्गिक  दृश्यांसाठी ओळखला जातो. हा शिवाजी महाराजांनी १६७१ मध्ये काबीज केला होता. हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच किल्ल्यांपैकी एक आहे. (Pinterest)
 सिंधुदुर्ग किल्ला: महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण किनारपट्टीवर हा किल्ला बांधण्यात आला आहे. हा किल्ला दगडी बांधकाम करून उभारण्यात आला आहे. हा किल्ला  इतिहास आणि स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे. परकीय आक्रमणांपासून कोकणचे संरक्षण करण्यासाठी आणि समुद्र सीमांचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला शिवाजी महाराजांनी   बांधला होता. 
share
(12 / 13)
 सिंधुदुर्ग किल्ला: महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण किनारपट्टीवर हा किल्ला बांधण्यात आला आहे. हा किल्ला दगडी बांधकाम करून उभारण्यात आला आहे. हा किल्ला  इतिहास आणि स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे. परकीय आक्रमणांपासून कोकणचे संरक्षण करण्यासाठी आणि समुद्र सीमांचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला शिवाजी महाराजांनी   बांधला होता. (Pinterest)
राजगड किल्ला: राजगड किल्ला, ज्याला किल्ल्यांचा राजा म्हणूनही ओळखले जाते. हा किल्ला पुण्यातील वेल्हे तालुक्यात आहे.  शिवाजी महाराजांनी रायगडावर राजधानी हलवण्यापूर्वी हा किल्ला मराठा साम्राज्याची राजधानी होता. या किल्ल्यावरून मनमोहक दृश्ये दिसतात आणि हे ट्रेकिंगचे लोकप्रिय ठिकाण आहे. 
share
(13 / 13)
राजगड किल्ला: राजगड किल्ला, ज्याला किल्ल्यांचा राजा म्हणूनही ओळखले जाते. हा किल्ला पुण्यातील वेल्हे तालुक्यात आहे.  शिवाजी महाराजांनी रायगडावर राजधानी हलवण्यापूर्वी हा किल्ला मराठा साम्राज्याची राजधानी होता. या किल्ल्यावरून मनमोहक दृश्ये दिसतात आणि हे ट्रेकिंगचे लोकप्रिय ठिकाण आहे. (Pinterest)
इतर गॅलरीज