Thane Jail News: ठाण्यातील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी गेल्या महिन्यात नाताळमध्ये लाखो रुपयांची कामाई केली आहे. या कैद्यांनी बेकरी प्रोडक्टच्या माध्यमातून अवघ्या सात दिवसांत तब्बल साडेसहा लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. नाताळ आणि नवर्षासाठी बाजारात विविध कंपन्याचे केक उपलब्ध असताना ठाणे कारागृहातील कैंद्यानी तयार केलेले केक सरस ठरले. त्यामुळे या कैद्यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ठाणे कारागृहातील कैद्यांनी नाताळ आणि नववर्षानिमित्त केक तयार केले. उत्तम दर्जा, खमंग आणि चवदार असलेल्या या केकला खवय्यांनी चांगलीच पसंती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहातील १२ कैंद्यानी २१ हजार ६६६ कप आणि १९१ किलो स्पंज केक बनवले, जे कारागृहाबाहेरील विक्री केंद्रावर नागरिकांना विक्रीसाठी ठेवले. दरम्यान तळोजा, आर्थर रोड, भायखळा कारागृहामध्ये हजारोंच्या संख्येने तयार केलेले पाठवण्यात आले.
विशेष म्हणजे, बाजारात अनेक नामांकित केक निर्माता कंपन्या आहे. मात्र, तरी देखील लोकांनी या केकला पसंती दर्शवली. उत्तर दर्जा आणि रुचकर चवीमुळे कैद्यानी तयार केलेल्या केकला नागरिकांनी पसंती दाखवली,असे सांगितले जात आहे. कैंद्यानी तयार केलेल्या केकच्या विक्रीतून कारागृहाला अवघ्या सात दिवसांत साडे सहा लाखांचे उत्पन्न मिळाले.
ठाणे कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, केकचा दर्जा नेहमीप्रमाणे उत्तम ठेवल्यामुळे नागरिकांच्या पंसतीला पात्र ठरलो. स्पर्धात्मक काळात आपल्या केकचा दर्जा सर्वोत्तम ठरावा याची कारागृह प्रशासनाने विशेष काळजी घेतली.त्यासाठी गुटीन, इस्ट याचे योग्य प्रमाण ठेवत केक रुचकर आणि स्वादिष्ट कसा बनेल यावर भर दिला जातो. तसेच केक व्यतिरिक्त खारी, टोस्टसारखे खाद्यपदार्थदेखील विक्रीसाठी ठेवण्यात आले. त्यांनादेखील नागरिकांनी पसंती देत मनसोक्त खरेदी केली, असेही त्या म्हणाल्या.
संबंधित बातम्या