बीडमध्ये शिक्षक दिनाच्या दिवशीच शिक्षक-विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका उर्दू शिक्षकाने एका ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बलात्कार केल्याची संतापजनक घडना समोर आली आहे. या आरोपीवर पेठ बीड पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. रियाज शेख असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. बीडमधील मोमीनपुरा भागात राहणारा मौलाना रियाज शेख आपल्या घरी उर्दू आणि अरबी भाषेची शिकवणी घेत होता. प्रत्येक विद्यार्थ्यांची शिकवणीची वेळ वेगवेगळी होती. याचाच गैरफायदा घेत आरोपी गेल्या अनेक महिन्यांपासून ११ वर्षाच्या मुलीवर नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार करत होता.
याची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबियांनी धक्का बसला. मुलीच्या पालकांनी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार दाखल केली. पत्नी व मुलं घरी नसताना आरोपी मुलीवर दुष्कर्म करत असे. आरोपीने अन्य मुलींवरही लैंगिक अत्याचार केला आहे का, याचा तपास केला जात आहे. आरोपीने अनैसर्गिक पद्धतीनं बलात्कार केल्याचीही माहिती तपासात उघड झाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, पीडिता उर्दू तसंच धार्मिक शिक्षण घेण्यासाठी गेल्या सहा ते सात महिन्यांपासून या शिक्षकाकडे जात होती. शिकवणीच्या वर्गातच तिच्यावर या काळात सात ते आठ वेळा अत्याचार झाला आहे.
मध्य प्रदेशातील एका प्राथमिक शाळेतील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शिक्षा म्हणून शिक्षकाने विद्यार्थिनीचे केस कापल्याप्रकरणी एका शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थीचे केस कापताना संबंधित शिक्षक दारूच्या नशेत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी शिक्षकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश बाथम यांनी दिली. वीरसिंह मेधा असे या शिक्षकाचे नाव आहे. या घटनेवरून लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.