10th Pass Job: दहावी उत्तीर्णांसाठी एसटी महामंडळात नोकरी; 'या' पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  10th Pass Job: दहावी उत्तीर्णांसाठी एसटी महामंडळात नोकरी; 'या' पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू!

10th Pass Job: दहावी उत्तीर्णांसाठी एसटी महामंडळात नोकरी; 'या' पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू!

Jun 03, 2024 03:51 PM IST

ST Mahamandal Dhule Bharti 2024: एसटी महामंडळात एकूण २५६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दहावी उतीर्ण उमेदवारांसाठी एसटी महामंडळात नोकरीची संधी उपलब्ध झाली.
दहावी उतीर्ण उमेदवारांसाठी एसटी महामंडळात नोकरीची संधी उपलब्ध झाली.

MSRTC Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. एसटी महामंडळातर्फे विविध पदांसाठी अर्ज मागिवले जात आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इयत्ता दहावी उतीर्ण अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

एसटी महामंडळ धुळे अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची एकूण २५६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. मोटार वाहन मेकॅनिक, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, मोटार वाहन बॉडी फिटर, इलेक्ट्रीशियन, टर्नर अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी २४ मे २०२४ रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. दहावी पास उमेदवाराकडे आयटीआय किंवा डिप्लोमा संबंधित ट्रेडमध्ये झालेला असावा.

रिक्त पदे

मोटर मेकॅनिक- ६५ जागा

डिझेल मॅकेनिक- ६४ जागा

शीट मेटल वर्कर- २८ जागा

वेल्डर- १५ जागा

इलेक्ट्रिशियन- ८० जागा

टर्नर- २ जागा

मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनीअर/डिप्लोमा- २ जागा

वय आणि अर्ज करण्याची पद्धत

या भरतीसाठी ३३ योगटापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी एसटी महामंडळाच्या msrtc.maharashtra.gov.in. या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

निवड प्रक्रिया

सर्वात प्रथम उमेदवारांची परीक्षा होणार आहे. त्यानंतर मुलाखत आणि कागदपत्रांच्या तपासणीनंतर उमेदवारांची निवड केली जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०२४ आहे. त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार एसटी महामंडाळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर