Pune suicide: धक्कादायक! पुण्यात मोबाइलवरील ब्लु व्हेल गेमच्या नादात दहावीतल्या मुलाने १४ व्या मजल्यावरून मारली उडी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune suicide: धक्कादायक! पुण्यात मोबाइलवरील ब्लु व्हेल गेमच्या नादात दहावीतल्या मुलाने १४ व्या मजल्यावरून मारली उडी

Pune suicide: धक्कादायक! पुण्यात मोबाइलवरील ब्लु व्हेल गेमच्या नादात दहावीतल्या मुलाने १४ व्या मजल्यावरून मारली उडी

Jul 30, 2024 07:14 AM IST

Pune suicide: पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याने मुलांना मोबाइलच्या आहारी जाऊ लागले आहेत. हेच व्यसन त्यांच्या जिवावर बेतत असल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. एका दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलाला मोबाईल गेमचे टास्क पूर्ण करण्याच्या नादात १४ चौदाव्या मजल्यावरून उडी मारली.

धक्कादायक! पुण्यात मोबाइलवरील ब्लु व्हेल गेमच्या नादात दहावीतल्या मुलाने १४ व्या मजल्यावरून मारली उडी
धक्कादायक! पुण्यात मोबाइलवरील ब्लु व्हेल गेमच्या नादात दहावीतल्या मुलाने १४ व्या मजल्यावरून मारली उडी

Pune Maval suicide: आज कालची तरुण पिढी ही मोबाइलच्या आहारी गेली आहे. त्याच बरोबर आता शाळेत शिकणारे मुले देखील मोबईलच्या आहारी जाऊ लागले आहेत. पालकांना वेळ नसल्यामुळे लहान वयातच मुलांच्या हातात मोबाइल दिला जातो.  मुले नेमके मोबाइलवर काय करतात याकडे मात्र, पालकांचे दुर्लक्ष होत असतं. मोबाइलचे हे व्यसन मुलांच्या जिवावर बेतत असल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात उघडकीस आला आहे. एका १० वीत शिकणाऱ्या मुलाला मोबाइलचे व्यसन जडले होते. मोबाइलवर गेम खेळतांना त्याला १४ व्या मजल्यावरून उडी मारण्याचा टास्क आला. हे टास्क पूर्ण करण्यासाठी त्याने कसलाही विचार न करता १४ व्या मजल्यावरून उडी मारली. यात या मुलाचा मृत्यू झाला.

ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पुणे मुंबई एक्स्प्रेस वे लगत असलेल्या किवळे गावात २६ जुलै रोजी घडली. दहावीत शिकणाऱ्या या मुलाला ब्लू व्हेल गेमचे व्यसन जडले होते. तब्बल सहा महिन्यांपासून मुलगा हा गेमच्या आहारी गेला होता. हा मुलगा हुशार होता. ९ वीत चांगले मार्क घेऊन तो उत्तीर्ण झाला होता. त्याचे वडील हे परदेशात असतात. मात्र, मोबाइल गेमच्या आहारी गेल्याने तो एकटाच राहत होता. स्वतल: खोलीत कोंडून घेऊन तो बडबड करत असायचा. २५ जुलै रोजी या मुलाने या गेमच्या नादात धक्कादायक पाऊल उचलले. मोबाइल गेमच्या नादात हा मुलगा स्वतःला बेडरूममध्ये तीन-तीन तास कोंडून घ्यायचा. टास्क पूर्ण करण्यासाठी घरी तो विविध वस्तूंची मागणी देखील करत होता. त्याला रोज विविध टास्क येत होते. व ते तो पूर्ण करत होता.

२५ जुलै रोजी पावसामुळे शाळेला सुट्टी होती. या दिवशी त्याने संपूर्ण दिवस गेम खेळण्यात घालवला. त्याने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले होते. त्याच्या आईने त्याला जेवण करण्यासाठी बाहेर येण्याची विनवणी केली. मात्र, तो आला नाही. आईने पुन्हा बोलवल्यावर तो बाहेर आला. त्याने जेवणाचे ताट घेऊन पुन्हा खोलीत गेला. आई दुसऱ्या मुलाला ताप आल्यानं त्या चिंतेत होती. रात्रीचा १ वाजला होता तरीही मुलाचा ताप उतरत नअसल्याने आई जागीचं होती. याच वेळी सोसायतीचया व्हाट्सएप ग्रुपवर एक मुलगा इमारतीवरून खाली पडला असून तो गंभीर जखमी असल्याचा मेसेज आला. हा मेसेज मुलाच्या आईने वाचला. तिला शंका आल्याने तिने मुलाच्या खोलीच्या दिशेने धाव घेतली. मात्र, खोलीचा दरवाजा बंद होता. तिने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. मात्र, मुलगा आत नव्हता. यानंतर ती धावत पळत खाली जखमी मुळाजवळ पोहोचली तेव्हा तिला धक्का बसला. तो तिचाच मुलगा होता. त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी घटनास्थळी येत त्याच्या खोलीची तपासणी केली. त्याच्या खोलीत गेममधील कोडिंगच्या भाषेत लिहिलेली काही कागदं आढळली. त्यावर घराचं स्केच होतं व गॅलरीतून जम्प कर, असा टास्क ही देण्यात आला होता. हाच टास्क त्याने फॉलो केला आणि १४ व्या मजल्यावरून उडी मारली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर