मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jalna mobile battery exploded: जालन्यात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Jalna mobile battery exploded: जालन्यात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 05, 2024 08:31 AM IST

mobile battery exploded in Jalna: जालन्यातील भोकरदन येथे मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

Death (Representative Image)
Death (Representative Image)

Jalna mobile battery exploded: जालन्यातील भोकरदन तालुक्यात धक्कादायक घटना घडली. मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने १० वर्षाच्या मुलाला जीव गमवावा लागला. ही घटना सोमवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. मोबाईल चार्जिंगला लावून फोनवर बोलताना बॅटरीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

समर्थ तायडे (वय, १०) असे मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. समर्थ हा सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील रहिवाशी आहे. तो भोकरदन शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जालना रोडवरील कुंभारी येथे गणेश दांडगे यांच्या तेराव्याचा कार्यक्रमासाठी गेला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर तो आपल्या कुटुंबासोबत आमठाणा येथे परतणार होते. मात्र, त्यापूर्वी मोबाईल चार्जिंगला लावून तो फोनवर बोलत होता. त्याच क्षणी बॅटरीचा स्फोट झाल्याने समर्थच्या कानाला आणि बोटाला गंभीर दुखापत झाली.

यानंतर समर्थच्या नातेवाईकांनी त्याला भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात समर्थला दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. या घटनेने तायडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

IPL_Entry_Point

विभाग