Thane News: ठाण्यात रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली. कुत्रा भुंकला म्हणून महिलांनी त्याच्या मालकाला घरात घुसून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. पीडित व्यक्तीच्या फिर्यादीवरून १० महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ठाणे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाळीव कुत्र्याच्या भुंकण्याच्या रागातून एका व्यक्तीवर आणि त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी दहा महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित भाजीविक्रेते आणि आरोपी शेजारी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू होते. त्यावेळी पीडिताच्या कुत्र्यांनी भुंकण्यास सुरुवात केली आणि आरोपींना त्रास दिला. यांनंतर महिलांच्या एका गटाने भाजीविक्रेत्याच्या घरात घुसून त्याला मारहाण केली. एवढेच नव्हेतर आरोपी महिलांनी दगडफेक करून त्यांच्या घराची तोडफोड देखील केली. या हल्ल्यात पीडित आणि त्याच्या कुटुंबातील काही सदस्य जखमी झाले आहेत.
याप्रकरणी भाजी विक्रेत्याने सोमवारी सकाळी ठाणे पोलिसांत तक्रार केली. त्याआधारे १० महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, यात हिंसाचार, बेकायदा जमाव, नुकसान पोहोचविण्याच्या उद्देशाने कृत्ये, अशांतता पसरवणे आणि दुर्भावनापूर्ण हेतूने अतिक्रमण करणे या आरोपांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या