गोंदिया बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून १० लाख तर पंतप्रधान निधीतून २ लाखांची मदत
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गोंदिया बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून १० लाख तर पंतप्रधान निधीतून २ लाखांची मदत

गोंदिया बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून १० लाख तर पंतप्रधान निधीतून २ लाखांची मदत

Nov 29, 2024 10:22 PM IST

शिवशाही बसला भीषण अपघात झाला. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. तर,अनेकजण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे.

गोंदिया बस अपघात
गोंदिया बस अपघात

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसला झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळामार्फत १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत, आवश्यकता वाटल्यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात येणार आहेत. 

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाखांची मदत - 

महाराष्ट्रातील गोंदिया येथे झालेल्या भीषण बस अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मोदींनी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी’तून मृतांच्या कुटुंबियांसाठी २ लाख रुपयांची मदत तर जखमी झालेल्या प्रवाशांसाठी ५०  हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

या दु:खद घटनेबाबत पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यम एक्सवर नमूद केले आहे की, महाराष्ट्रात गोंदिया येथे झालेल्या बस अपघातात जीवितहानी झाल्यामुळे अत्यंत व्यथित आहे. जखमींनी लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना व्य़क्त करतो. स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत करत असून मृतांच्या कुटुंबियांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी’तून 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.

गोंदियात (Gondia) शिवशाही बसला भीषण अपघात झाला. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गोंदिया - कोहमारा राज्य महामार्गावरील खजरी गावाजवळ शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. ही बस भंडारा येथून साकोली लाखनी मार्गे गोंदियाकडे जात होती. वळण घेत असताना अचानक समोरून एक दुचाकी आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात आले.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर