मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Police Bharti 2024: पोलीस भरतीसाठी स्पर्धा फार! पुण्यातील १ हजार २१९ पदांसाठी तब्बल पावणेदोन लाख अर्ज

Police Bharti 2024: पोलीस भरतीसाठी स्पर्धा फार! पुण्यातील १ हजार २१९ पदांसाठी तब्बल पावणेदोन लाख अर्ज

Jun 18, 2024 05:59 AM IST

Police Bharti 2024 : राज्यात पोलिस भरती प्रक्रिया बुधवार पासून सुरू होत आहे. पुण्यात १२१९ पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून या साठी तब्बल १ लाख ८१ हजार ७६९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

 पोलीस भरतीसाठी स्पर्धा फार! १ हजार २१९ पदांसाठी तब्बल पावणेदोन लाख अर्ज
पोलीस भरतीसाठी स्पर्धा फार! १ हजार २१९ पदांसाठी तब्बल पावणेदोन लाख अर्ज

Police Bharti 2024 : राज्यात पोलिस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती बुधवार पासून सुरू होणार असून यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान, या मेगा भरतीसाठी पुणे पोलिसांनी देखील तयारी केली आहे. पुण्यात पुणे शहर, ग्रामीण, लोहमार्ग पोलीस दल, कारागृह विभागातील १ हजार २१९ पदांसाठी भरती प्रक्रिया बुधवार पासून राबवली जाणार आहे. या जागांसाठी तब्बल १ लाख ८१ हजार ७६९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पुण्यात भरतीसाठी मोठी स्पर्धा आहे. ही भरती प्रक्रिया पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, पाषाण रस्त्यावरील ग्रामीण पोलिसांचे चव्हाणनगर येथील मुख्यालयात आणि खडकीतील लष्कराच्या दारूगोळा कारखान्याच्या मैदानावर पार पडणार आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४ अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील १७,४७१ रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया राज्यात सुरू होणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, जेल कॉन्स्टेबल, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन यासह विविध पदांसाठी १७,४७१ रिक्त जागा भरण्याचे या भरती मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जागा कमी अन् स्पर्धा फार

पुणे पोलीस दलात २०२ पदांसाठी २० हजार ३८२ अर्ज, पुणे जिल्हा ग्रामीण दलामध्ये ४९६ पदांसाठी ४२ हजार ४०३ उमेदवारांनी अर्ज, कारागृहातील शिपाई पदाच्या ५१३ जागांसाठी एक लाख १० हजार ४८८ अर्ज, पुणे लोहमार्ग विभागाच्या ६८ पदांसाठी ३ हजार १८२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे जागा कमी आणि स्पर्धा फार अशी अवस्था झाली आहे.

बुधवार पासून सुरू होणार भरती प्रक्रिया

ही भरती प्रक्रिया बुधवार पासून सुरू होणार आहे. यात उमेदवारांची शारीरिक मोजमाप पडताळणी व मैदानी चाचणी केली जाणार आहे. तीन ठिकाणी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. खुल्या गटासह एकंदर अकरा प्रकारच्या जातीय व आर्थिक प्रवर्गांच्या माध्यमातून या भरती प्रक्रियेतून पोलिस भरती केली जाणार आहे.

गैरप्रकार आढळल्यास होणार कारवाई

पुणे पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अरविंदकुमार चावरिया, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, लोहमार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या बाबत माहिती दिली. पंकज देशमुख म्हणाले, ही भरती प्रक्रिया पारदर्शीपणे व काटेकोर पद्धतीने राबवली जाणार आहे. यात कुणी गैरप्रकार केल्याचे आढळल्यास त्याचवर कठोर कारवाई केली जाणार आहे. ही भरती योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी बायोमेट्रिक थम्बसह व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. तसेच, कोणी गैरप्रकार करत असेल, तर त्याबाबत माहिती देण्यासाठी तीन स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या प्राथमिक पडताळणीनंतर निकषात बसलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीचा दिनांक आणि वेळ अधिकृतरीत्या कळवण्यात आली आहे.

दुसरी संधि नाही

उमेदवारांना कळविण्यात आलेल्या आलेल्या भरती प्रक्रियेसाठी त्यांना कोणत्याही कारणास्तव उपस्थित राहता आले नाही, तर त्यांना दिनांक बदलून मिळणार नाही. तसेच, त्यांना दुसरी संधीही देण्यात येणार नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नागपूरला ६०२ जागांसाठी एकूण ८५ हजार २८४ अर्ज; १९ पासून होणार भरती

नागपूर येथील २०२२-२३ च्या पोलीस व कारागृह विभागाच्या भरती प्रकियेतील शारीरिक चाचणीला १९ जूनपासून सुरुवात होणार आहे. या दोन्ही विभागांच्या ६०२ जागांसाठी एकूण ८५ हजार २८४ अर्ज आले आहेत. सरासरी एका जागेमागे १४१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. नागपूर पोलीस मुख्यालयातर्फे पोलीस शिपायांच्या ३४७ व कारागृह विभागाच्य २५५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलीस शिपाईपदांसाठी एकूण २९ हजार ९८७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात ७ हजार ७१३ महिला व पाच तृतीयपंथींयांचा समावेश आहे. तर कारागृहातील भरतीसाठी ५५ हजार २९७ अर्ज मिळाले असून त्यात १५ हजार ६१८ महिला व पाच तृतीयपंथी आहेत.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर