- एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात राजकीय गोंधळ माजला आहे. शिवसेनेचे एक एक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाऊन मिसळत आहे. दरम्यान या राजकीय अस्तिर परिस्थतीवर दत्तात्रय भरणे यांनी सुचक वक्तव्य केले आहे.
Maharashtra Political crisis एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेला भडदाड पडले आहे. शिवसेनेचा एक एक मंत्री शिंदेगोटात जात असतांना शिवसेना एकाकी पडतांना दिसत आहे. या सत्ता संघर्षाथ शिवसेनेचे अस्तित्व पणाला लागले आहे. शिंदे गटाकडे आता ४९ आमदार आहेत. त्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. दरम्यान, शिंदे यांच्या याचीकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या राज्यातल्या अस्तिर परिस्थीतवर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुचक वक्तव्य केले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
राज्यातील अस्तिर परिस्थीतीत राष्ट्रवादी अॅक्टीव्ह झाली आहे. आमचा शेटवपर्यंत शिवसेनेनला पाठींबा म्हणत महाविकास आघाडीला समर्थन जेष्ठ नेते शरद पवार यांनी दिले आहे. त्यात बंडखोरांना पुन्हा परत आणण्यासाठी त्यांनी सर्व सुत्रे हाती घेतल्याचेही बोलले जात आहे. मात्र, शिवसेनेची शक्ती दिवसेंदिवस कमी होतांना दिसत आहे. त्यात त्यांचेच मंत्री असलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सत्तेबद्दल वक्तव्य केले आहे.
दत्तात्रय भरणे त्यांच्या मतदार संघात इंदापूर येथे एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. भरणे म्हणाले, राज्यात सध्या राजकीय अस्थिर परिस्थीती निर्माण झाली आहे. राज्यात काहीही होऊ शकतं. सत्ता राहिन किंवा राहणार नाही. मी मात्र, तुमचा आमदार कायम राहिल. या माध्यमातून मतदार संघात विकास कामांवर परिणाम होणार नाही, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थीती कुठल्या मार्गाने जात आहे, याची त्यांना जाणीव झाली असावी यामुळेच त्यांनी हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे.
संबंधित बातम्या