पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मेगा गळतीचे आत्मचिंतन करा! फडणवीसांचा विरोधकांना टोला

देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक यांच्यासह नवी मुंबईतील ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या नेत्यांचे स्वागत करताना फडणवीसांनी विरोधकांवर तोफ डागली. काहींना आमच्याकडे सुरु असलेल्या मेगा भरतीची चिंता वाटत आहे. त्यांनी याचा विचार करण्यापेक्षा आपल्या पक्षाला मेगा गळती का लागली याविषयी आत्मचिंतन करावे, असे मुख्यंमंत्री यावेळी म्हणाले.

४८ नगरसेवकांसह गणेश नाईकांनी हाती घेतला भाजपचा झेंडा

भारतीय जनता पार्टी हा मोठा परिवार आहे. या परिवारात सहभागी झालेल्या सदस्यांच स्वागत करुन आम्हाला परिवार विस्तार करण्यात आनंद होत आहे. आमच्याकडे येणारी लोक सत्ता किंवा पदासाठी आलेली नाहीत. तर देशाच्या विकासात योगदान देण्याच्या हेतून आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व जनतेने मान्य केले आहे. ज्याला समाजासाठी आणि देशासाठी काम करण्याची मनापासून इच्छा आहे, अशा प्रत्येक व्यक्तिला मोदींच्या नेतृत्वाखाली काम करावे वाटते, असेही फडणवीस यांनी म्हटले.

निष्ठेने वागायचे असल्यास भाजपशिवाय पर्याय नाही: हर्षवर्धन

गणेश नाईक यांच्यासोबत तब्बल नवी मुंबईतील ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे नवी मुंबई पालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता धोक्यात आली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly elections 2019 CM Devendra Fadnavis Target on Opposition in navi mumbai