पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'लोकांच्या समस्या संपलेल्या नाहीत, पण त्यांचा आमच्यावर विश्वास'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील जनतेच्या समस्या संपलेल्या नाहीत, पण आमच्यावर जनतेचा विश्वास आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारमधील क्षमता जनतेने हेरली आहे. त्यामुळेच महाजनादेश यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.  

पुणे शहरात नियोजित वेळेपेक्षाही उशीराने प्रवेश केल्यानंतरही लोकांनी महाजन यात्रेला चांगला प्रतिसाद दिला. यावेळी वाहतूक विस्कळीत झाल्याबद्दल मुख्यंत्र्यांनी पुणेकरांची दिलगिरी देखील व्यक्त केली. पुणेकरांनी जो प्रतिसाद दिला तो अभूतपूर्व असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. आपल्या सरकारच्या मागील पाच वर्षांचा दाखला देताना फडणवीस म्हणाले की,  गेल्या पाच वर्षात पुण्यासह  पश्चिम महाराष्ट्रात सरकारने उल्लेखनीय कामे केली आहेत. शहरात मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे.    

'काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मनसेला स्थान नाही'

ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार आणि केंद्रसरकारच्या माध्यमातून पुण्यात ४० ते ४५ कोटींचे प्रकल्प राबवले जात आहेत. नवीन विमानतळासाठी निधी मंजूर झाला असून लवकरच त्याचे काम सुरु होईल, असेही फडणवीस यावेळी सांगितले. पुणे शहरात अधिकाधिक गुंतवणूक व्हावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. संपूर्ण देशाचा विचार करता औद्योगिक क्षेत्रातील सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झाली. परदेशी गुंतवणूकीतही महाराष्ट्रच अग्रेसर आहे. देशातील सर्वाधिक २५ टक्के रोजगार देखील महाराष्ट्रात उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.   

मुख्यमंत्र्यासमोर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांचा लाठीमार

'मेक इन इंडिया'सारख्या उपक्रमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. मागील पाच वर्षांत शैक्षणिक क्षेत्रात राज्य सरकारने उल्लेखनिय कामगिरी केली आहे. आघाडी सरकारच्या काळात जे शक्य झाले नाही ते आपल्या सरकारने करुन दाखवले, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.