पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हर्षवर्धन पाटलांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला!

हर्षवर्धन पाटील

काँग्रेसचे  दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतील.  विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश राज्यातील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मोठा धक्का देणारा असेल. 

हर्षवर्धन पाटलांच्या आरोपांमुळे धक्काः सुप्रिया सुळे

इंदापूर विधानसभा मतदार संघांचे त्यांनी सलग ४ वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले असून यामध्ये सलग ३ वेळा ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या  युती सरकारमधील ५ वर्षे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये सलग १४ वर्षे मंत्री म्हणून काम केले आहे.

सभ्यपणाचा राष्ट्रवादीने गैरफायदा घेतला, हर्षवर्धन पाटलांचा आरोप

इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावरून हर्षवर्धन पाटील हे नाराज होते. राष्ट्रवादीने इंदापूरची जागा काँग्रेसला देण्यास तयार नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. मागील आठवड्यात इंदापूर येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त कली होती. भाजप प्रवेशानंतर इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील हे भाजपकडून लढविण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.