पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस-राष्ट्रवादीत प्रत्येकी १२५ चा फॉर्म्युला निश्चित; मित्र पक्षांना ३८ जागा

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष

विधानसभा निवडणुकीच्या तारखा काही दिवसात जाहीर होतील. त्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठका सुरु आहे. दोन्ही पक्षांचा जागा वाटपाबाबतचा निर्णय झाला आहे. दरम्यान, जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून दोन्ही पक्ष प्रत्येकी १२५ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. तर मित्र पक्षांना ३८ जागा देणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पुणे येथे दिली. 

लोकशाहीच्या खुनाबद्दल बोलण्याचा काँग्रेसला अधिकार आहे का - मुख्यमंत्री

तसंच, 'दोन्ही पक्ष प्रत्येकी १२५ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. मात्र जागांबाबत अद्याप चर्चा सुरुच आहे. कारण राष्ट्रवादीकडे असलेल्या काही जागा काँग्रेस मागत आहे. तर काँग्रेसकडे असलेल्या काही जागा राष्ट्रवादी काँग्रेस मागत आहे. त्यामुळे या जागांची अदलाबदली ही बैठकीत होईल', असे चव्हाण यांनी सांगितले. तर, 'गेल्या निवडणुकीत आम्ही एकत्र लढलो असतो तर निकाल वेगळा लागला असता. आता मागीच चूक न करता आम्ही आघाडीवर शिक्कामोर्तबल केले', असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

एक्स्प्रेस वेवर अपघातात पुण्यातील डॉक्टरांसह दोघांचा मृत्यू